Ashish Shelar On Aaditya Thackeray | भाजपाची आदित्य ठाकरेंवर टीका; म्हणाले – ‘यांना वाघनखे टोचतात अन पेंग्विन घेऊन, हे…’

Mumbai Pollution | mumbai pollution has increased due to aditya thackeray ashish shelars allegation arey colony

मुंबई : Ashish Shelar On Aaditya Thackeray | राज्य सरकार छत्रपती शिवरायांची वाघनखे (Chatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh) लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममधून भारतात ३ वर्षांसाठी आणण्याकरता ३ ऑक्टोबर रोजी सामंजस्य करार करणार आहे. यासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार लंडनला रवाना झाले आहेत. मात्र, या वाघनखांवर तज्ज्ञांनी प्रश्नचिन्हे उपस्थित केल्याने राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेनंतर मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी आदित्य यांच्यावर टीका केली आहे. (Ashish Shelar On Aaditya Thackeray)

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी वाघनखे आणण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना म्हटले होते की, व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयातील वाघनखे तीन वर्षांसाठी उसनावारी देण्याचे मान्य केले आहे. मग, हे कर्जावर आहे की परतावा आहे? परतावा असेल, शिवाजी महाराज यांचे मंदिर व्हावे आणि त्यात वाघनखे ठेवावी. पण, ही वाघनखे शिवकालीन की शिवाजी महाराज यांनी वापरलेली आहेत? (Ashish Shelar On Aaditya Thackeray)

यावर आता आशिष शेलार यांनी एक ट्विट केले असून यात म्हटले आहे की, वाघनखे येणार कळताच, इथले नकली वाघ का बिथरले? छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागणारे, आता वाघनखांचेही पुरावे मागू लागले? आम्हाला शिवकालीन जे जे सापडेल ते ते सारे प्रिय. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती सुद्धा आम्हास वंदनीय.

आशिष शेलार यांनी यांनी म्हटले आहे की, इथे हळूहळू हळूहळू औरंगजेबी वृत्ती मात्र डोकं वर काढतेय? महाराजांच्या पराक्रमाचेच इथे पुरावे मागतेय? आदू बाळाने शाळेतील पुस्तक सोडून अन्य काही वाचलेय का? यांना वाघनखे टोचतात आणि पेंग्विन घेऊन हे गावभर नाचतात? अहो, पबमधला थरथराट बाहेर असा कोण करतो का? अफझलखान तुमचा कोण पाहुणा लागतो का?

दरम्यान, या वाघनखांच्या सत्यतेबाबतच इतिहासकारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.
लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममध्ये असलेल्या वाघनखांबाबत कोल्हापूर येथील इतिहास
संशोधक इंद्रजित सावंत यांनी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. सरकारने शिवप्रेमींची दिशाभूल करू नये,
असे सावंत यांनी म्हटले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

INDIA Alliance Main Bhi Gandhi Rally In Mumbai | ‘इंडिया’च्या ‘मी पण गांधी’ पदयात्रेला गालबोट, मुंबईत कार्यकर्ते-पोलिसांत वादंग?

Total
0
Shares
Related Posts