Ashish Shelar On Baramati Lok Sabha | भाजपा नेते आशिष शेलार यांनी बोलता-बोलता एक मोठी चूक केली; म्हणाले… (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Ashish Shelar On Baramati Lok Sabha | बारामती लोकसभा निवडणुकीची चर्चा सध्या संपूर्ण राज्यात आहे. येथे अजित पवारांच्या (Ajit Pawar) पत्नी महायुतीकडून (Mahayuti) लढत आहेत, तर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आहेत. रोजच्या रोज दोन्हीकडील नेते एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप, टीका-टीपण्णी करत आहेत. मात्र, काल भाजपा नेते आशिष शेलार यांनी बोलता-बोलता एक मोठी चूक केली. ही चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी झालेली चूक सुधारण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत ते अत्यंत चुकीचे असे वाक्य बोलून गेले होते.(Ashish Shelar On Baramati Lok Sabha)

भाजपचे नेते आशिष शेलार हे पुण्यात आले होते. त्यावेळी राज्यातील अनेक घडामोडीवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. आशिष शेलार यांना प्रश्न विचारण्यात आला की, राज्यातील ४८ पैकी ४५ जागा महायुती जिंकणार असल्याचा दावा महायुतीचे नेते करत आहेत. त्या ४५ जागांमध्ये बारामतीची जागा असणार का. यावर आशिष शेलार म्हणाले की, बारामतीमध्ये सुनेत्राताई (Sunetra Ajit Pawar) यांचा पराभव निश्चित होणार.

आपण चुकीचे वाक्य बोललो, आपल्याच उमेदवाराचा पराभव होणार, असे बोलल्याचे लक्षात येताच आशिष शेलार यांनी
बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, बारामतीमध्ये बदल होईल.
सुप्रिया सुळे याचा पराभव नक्की होईल, किती मताने होईल हे सांगता येणार नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap On PSI | गुन्हा दाखल न करण्यासाठी 10 लाखाची मागणी, पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन ज्येष्ठ नागरिकाकडे खंडणीची मागणी