Ashish Shelar On Sanjay Raut | ‘… तर संजय राऊतांनी गजनी सिनेमा बघावा’ – आशिष शेलार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ashish Shelar On Sanjay Raut | राज्यात सध्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन (Maharashtra Cabinet Expansion) मोठा गदारोळ सुरु आहे. एकीकडे राज्य सरकार मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा करत असताना दुसरीकडे विरोधी पक्षाकडून टीका केली जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी भारतीय राज्यघटनेच्या कलम 164 1A नुसार राज्याचे मंत्रिमंडळ किमान 12 मंत्र्यांचे असणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी संख्येचा मंत्रिमंडळाला घटनेची मान्यता नाही. गेले 2 आठवडे महाराष्ट्रात 2 मंत्र्यांचे मंत्रिमंडळ जे निर्णय घेतेय त्याला घटनात्मक वैधता नाही, असे ट्विट केले होते. राऊतांच्या दाव्यावर भाजप आमदार (BJP MLA) आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या काळात किती मंत्री होते हे त्यांना आठवत नसेल, तर त्यांनी घरी जाऊन गजनी सिनेमा (Ghajini Cinema) बघावा, असा सल्ला आशिष शेलार यांनी राऊतांना दिला आहे. (Ashish Shelar On Sanjay Raut)

आशिष शेलार यांनी ट्विट करुन संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) 7 जणांच्या मंत्रिमंडळाने 32 दिवस निर्णय घेतले आणि आता म्हणे संविधानाचे अनुच्छेद (Articles of the Constitution) 164 (1 A) सांगते 12 सदस्यांचे मंत्रिमंडळ हवे. अहो तुम्हाला कायदा, संविधान काही तरी कळते का ? संविधानातील हे कलम मंत्रिमंडळाचा आकार किती आसावा, याच्याशी संबंधित आहे. विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येपेक्षा 15 टक्के अधिक मंत्री नको, पण असे करताना किमान 12 असा त्याचा अर्थ आहे. उदा. गोवा अशा लहान राज्यांसाठी ही तरतूद आहे. तिथे नियमाने केवळ 6 मंत्री होऊ शकतात. पण या नियमाने 12 आहेत. विस्ताराच्या कालावधीचा या संविधानाच्या कलमात कुठेही उल्लेख नाही. अज्ञान आणि विपर्यासाचा काळ संपलाना मा. खासदार संजय राऊतजी अशा शब्दात शेलार यांनी राऊतांना टोला लगावला आहे.

 

राऊतांनी गजनी सिनेमा बघावा

संजय राऊत हे फिल्म निर्माते असल्यामुळे त्यांनी घरी गेल्यावर गजनी सिनेमा नक्की बघावा.
ज्यांना विसरण्याची सवय असते अशा सगळ्या पंडितांनी हा सिनेमा बघावा, असा सल्ला आशिष शेलार यांनी दिला आहे.
ज्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे राज्य होते त्यावेळी 32 दिवस किती मंत्री होते याचे उत्तर त्यांनी द्यावं,
याचा अर्थ त्यांचे सरकारही अनधिकृत होतं का ? असा सवाल त्यांनी केला आहे.

 

Web Title :- Ashish Shelar On Sanjay Raut | bjp leader and mla ashish shelar reply to criticism of cabinet expansion by sanjay raut

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा