Ashish Shelar On Shivsena Uddhav Thackeray | एक खोट बोलल्यामुळे शंभर खोटे बोलावे लागतेय ! मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांचा टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ashish Shelar On Shivsena Uddhav Thackeray | उध्दव ठाकरे हे एक खोटे बोलल्यामुळे त्यांना आता शंभर वेळा खोटे बोलावे लागते आहे, असा टोला मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी लगावला. (Lok Sabha Election 2024)

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना मुख्यमंत्री करण्याबाबत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शब्द दिला होता अशा आशयाचे विधान उबाठा गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी केले होते त्यावर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आमदार ॲड आशिष शेलार म्हणाले की, गेले दोन चार वर्षे उध्दवजी म्हणत होते की, मी आणि अमितशाह यांच्यात चर्चा झाली. अमित शाह (Amit Shah) यांनी मला मुख्यमंत्री पदाबाबत शब्द दिला होता, असा दावा त्यांनी केला होता. तर आता त्यांनी दुसरा दावा केला आहे की, माझी आणि देवेंद्रजींची चर्चा झाली. वर्षानुवर्षे दावे ते बदलत आहेत. (Ashish Shelar On Shivsena Uddhav Thackeray)

तशी कोणतीही चर्चा झाली नाही हे अमितभाई शाह यांनी स्पष्ट केले त्यामुळे उध्दव ठाकरे यांचे हे खोट विधान ना जनतेला पटले, ना शिवसैनिकांना पटले, त्याचा पुरावा ही त्यांच्याकडे नाही त्यामुळे आता ते आणखी एक खोटे बोलत आहेत. माझी आई मला सांगत असे की, खोटे कधी बोलू नको, एक खोटे बोलले की पुढे शंभर खोटे बोलावे लागते. उध्दव ठाकरे आपले एक खोटे पचवण्यासाठी आणखी एकदा खोटे बोलले आहेत.

आणखी त्यांना कितीवेळा खोटे बोलावे लागणार आहे असा प्रश्न आहे. दुसरा महत्वाचा मुददा म्हणजे केंद्रीय मंत्री अमितभाई शाह यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले होते की, पुत्र प्रेमातून शिवसेनेत फुटली. आज याला पुष्टी मिळाली असून शिवसैनिकाला मुख्यमंत्री पदी बसवायचे आहे असे उध्दव ठाकरे बोलत जरी असले तरी प्रत्यक्षात आदित्यलाच मुख्यमंत्री करायचे पोटात होते, त्यांच्या मनातील चांदणे आता समोर आले आहे, असेही आमदार ॲड आशिष शेलार म्हणाले.

विशेष म्हणजे ते जे वारंवार खोटे बोलत आहेत त्याचे कुठलेही परिस्थितीजन्य पुरावे त्यांच्याकडे नाहीत,
भाजपाकडे असे अनेक पुरावे असून या मुद्दयावर उध्दव ठाकरेच खोटे बोलत
आहेत हेच पुन्हा पुन्हा सिध्द होते आहे असेही आमदार ॲड आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Police Personnel Died In Accident | दोन दुचाकींची समोरासमोर धडक, पोलीस कर्मचाऱ्यासह दोघांचा मृत्यू

Amol Kolhe | मी, माझं, माझ्यासाठी हा वैयक्तिक अजेंडा डोळ्यासमोर ठेऊन मी निवडणूक लढवत नाही – डॉ. अमोल कोल्हे

Pune Crime Court | पुणे : पतीच्या खुनाच्या गुन्ह्यातील महिला आरोपीची गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता

Baramati Lok Sabha Election 2024 | अजितदादांचा डमी अर्ज नामंजूर, बारामतीमध्ये नणंद विरूद्ध भावजयी अशीच लढत