Ashish Shelar | सचिन वाझे हे शिवसेनेचे कार्यकर्ते, हे ऑन रेकॉर्ड स्पष्ट, आशिष शेलारांचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ashish Shelar | सचिन वाझे (Sachin Waze) हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेना (Shivsena) पक्षाचे कार्यकर्ते होते, हे कागदोपत्री स्पष्ट झाले आहे, असा आरोप भाजपाचे (BJP) मुंबईतील नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला आहे. दरम्यान, बुलढाण्यात ‘हिंदू गर्व गर्जना’ (Hindu Garv Garjana) कार्यक्रमात बोलताना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव (MP Prataprao Jadhav) यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप करताना म्हटले आहे की, मातोश्रीवर (Matoshree) दर महिन्याला शंभर खोके पाठवले जात होते, असा आरोप केला होता. यावर आता शेलारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले, सचिन वाझे हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते होते, हे स्पष्ट झाले आहे, हे ऑन रेकॉर्ड आहे. सचिन वाझे यांना पुन्हा पोलीस दलात जेव्हा घेण्यात आले, त्यावेळी कुणी दबाव टाकला होता? कुणी विशेष प्रयत्न केले होते? हेही न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहे. दोन्ही गोष्टी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घडल्या आहेत. यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हात दिसत आहे. त्यामुळे परिस्थितीजन्य पुरावे पाहता प्रतापराव जाधवांनी दिलेल्या माहितीला बळ मिळत आहे.

 

दरम्यान, बुलढाण्यात बोलताना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव म्हणाले होते
की, अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे हे आता तुरुंगात आहेत.
हे लोक महिन्याला वसुली करत होते. सचिन वाझे हे दर महिन्याला 100 खोके मातोश्रीवर पाठवत होते.

 

Web Title :- Ashish Shelar | sachin waze was worker of uddhav thackeray shivsena ashish shelar claim

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mushtaq Ali T20 | विदर्भ क्रिकेट संघाच्या उपकर्णधारपदी अकोल्याच्या अथर्व तायडेची निवड

Pune Chandni Chowk Traffic Start | चांदणी चौकातील वाहतूक साडे अकरा तासांनी पूर्ववत

Maharashtra CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी, यंत्रणा सतर्क