‘नागरिकत्व सुधारणा विधेयकावर शिवसेनेने आपला ‘बाणा’ दाखवावा’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – नागरिकत्व सुधारणा विधेयक हे देशासाठी आवश्यक असून शिवसेनेने आपला मुळ बाणा दाखवावा व हे विधेयक स्वीकारावे, असे आवाहन भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी केले आहे. उत्तर महाराष्ट्रातील १२ जागांवर भाजपाचा पराभव झाला. या १२ जागांचा अहवाल तयार करण्याची जबाबदारी आशिष शेलार यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यासाठी ते नाशिकला आले असताना त्यांनी पत्रकारांना संबोधित केले.

आशिष शेलार यांनी सांगितले की, देशासाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक आवश्यक असून महाराष्ट्राने त्याचा स्वीकार करावा. शिवसेनेने आपला मुळ बाणा दाखवावा. कोणाला घाबरु नये. मात्र, सरकार वाचविण्यासाठी देशहित बाजूला ठेवू नका, असे आवाहन त्यांनी शिवसेनेला केले आहे.

राष्ट्र सर्वप्रथम हा भाजपाचा अजेंडा आहे. देशहितासाठी भाजपा शिवसेनेसोबत राजकीय तडजोड करायला तयार आहे. सत्ता आणि सत्तेसाठी राजकारण हा भाजपाचा हेतू कधीच नव्हता. नागरिक सुधारणा विधेयकाची अंमलबजावणी देशासाठी आवश्यक आहे. घुसखोरांना घालवले पाहिजे. भारतात शिरलेल्या घुसखोरांना वाचविणे ही काँग्रेसची भूमिका आहे, असे सांगत शेलार म्हणाले, शिवसेनेने लोकसभेत समर्थन केले. मात्र राज्यसभेत पळून गेले. मात्र सरकार वाचविण्यासाठी देशहित बाजूला ठेवू नका, असे त्यांनी शिवसेनेला आवाहन केले आहे.

उत्तर महाराष्ट्रातील १२ जागांवर पक्षाचा पराभव कसा झाला, याचा अहवाल पक्षश्रेष्ठींना सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like