Ashish Shelar | मुरजी पटेलांच्या रडणाऱ्या कार्यकर्त्यांना आशिष शेलारांनी समजावले; म्हणाले, ‘उर्जा राखून ठेवा, येणाऱ्या दोन महिन्यात…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंधेरी पूर्व पोटनिवडणूक (Andheri By Election) बिनविरोध करण्याचा निर्णय भाजपने (BJP) घेतला आहे. त्यामुळे भाजप आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाचे संयुक्त उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) यांना माघार घ्यावी लागली आहे. त्यावर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला आहे. आपली ऊर्जा राखून ठेवा आणि दोन महिन्यांना येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत (Brihanmumbai Municipal Corporation Election) तिचा सदुपयोग करु, असे आशिष शेलार (Ashish Shelar) मुरजी पटेल यांच्या कार्यकर्त्यांना म्हणाले.

 

भाजपच्या पक्ष नेतृत्वाने मुरजी पटेल यांचा अंधेरी पोटनिवडणुकीतून यशस्वीरित्या माघार घेतल्याचा निर्णय घेतल्याने त्यांचे कार्यकर्त्ये कमालीचे नाराज झाले आहेत. मुरजी पटेल यांना माघार घेण्याचा पक्षादेश आल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. संतप्त कार्यकर्त्यांनी यावेळी राज ठाकरे मुर्दाबादच्या घोषणा देखील दिल्या. यावेळी पटेल यांनी भाजपच्या आशिष शेलार आणि इतर प्रमुख नेत्यांची भेट घेतली. यावेळी मुरजी पटेल यांच्या चेहऱ्यावर निराशा होती. आशिष शेलारांनी (Ashish Shelar) त्यांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची समजूत काढली.

यावेळी शेलार कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले, मी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, पक्षाने निर्णय घेतला आहे.
पण आपली ऊर्जा राखून ठेवा. दोन महिन्यांनी येणाऱ्या महापालिका निवडणुकीत आपण याचा सदुपयोग जरुर करु.
त्यामुळे आगामी मुंबई पालिकेच्या निवडणुकीत मुरजी पटेल यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविली जाणार असल्याचे कळते आहे.

 

भाजपच्या नेतृत्वाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करुन महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे.
पक्षाचा हा निर्णय सर्व कार्यकर्त्यांना मान्य आहे.
भाजपने घेतलेली भूमिका महाराष्ट्राच्या संस्कृतीला, प्रथा-परंपरेला उच्च स्तरावर नेणारी आहे, असे आशिष शेलार म्हणाले.

 

Web Title :- Ashish Shelar | save your energy for bmc election 2022 ashish shelar told bjp workers after murji patel nomination withdraw from andheri bypoll

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jayant Patil | भाजपला उशिरा सुचलेले शहाणपण आहे, अन्यथा त्यांना…, जयंत पाटलांचा भाजपला टोला

Sanjay Raut | राज ठाकरेंचे भाजपला दिलेले पत्र हा केवळ स्क्रिप्टचा भाग, संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका

Mandakini Khadse | जळगाव दूध संघातील अपहार प्रकरणात खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यावर गुन्हा दाखल