Ashish Shelar | ज्यांनी अडीच वर्षात शेतकऱ्यांचे अश्रू पुसले नाहीत, ते आता दौरे करत आहेत, आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन – शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांच्याशी संवाद साधत आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी औरंगाबाद दौरा केला. त्यांच्या या दौऱ्यावर भाजप (BJP) आणि शिंदे यांच्या गटातीन नेते आणि आमदार टीका करत आहेत. भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी देखील ठाकरेंच्या दौऱ्यावर भाष्य केले आहे. ज्यांना अडीच वर्षात काही करता आले नाही, ज्यांनी अडीच वर्षात शेतकऱ्यांचे अश्रू पुसले नाहीत, ते आता दौरे करत आहेत, असे आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले.

 

जे मागील अडीच वर्षात घरातून बाहेर पडले नाहीत. त्यानी आज टीका करायला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई देण्याची कामे आणि शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणण्याचे काम शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या आदेशाने पीक विमा कर्जामार्फत शेतकऱ्यांना मदत करतो आहोत.

 

केंद्र सरकारने देखील केंद्राच्या खात्यातून शेतकऱ्यांना मदत केली आहे. तरी देखील आम्ही राज्य पातळीवर पुन्हा एकदा परतीच्या पावसाने (Rain in Maharashtra) झालेल्या नुकसानीची पाहणी करुन शेतकऱ्यांना मदत करत आहोत.
त्यामुळे आमच्या सरकारचे सुरु असलेले चांगले काम पाहुन विरोधकांच्या डोळ्यात ते खुपते आहे,
म्हणून ते टीका करत आहेत. ज्यांनी मागील अडीच वर्षांत शेतकऱ्यांसाठी काही केले नाही.
शेतकऱ्यांचे अश्रू पुसले नाहीत, ते आता दौऱ्यावर निघाले आहेत, असे आशिष शेलार म्हणाले.
शेलार (Ashish Shelar) मुंबईत आयोजित एका दिवाळी पहाटच्या कार्यक्रमानंतर बोलत होते.

दरम्यान, ठाकरेंच्या दौऱ्यावर शिंदे समर्थक आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी देखील टीका केली आहे.
ठाकरे यांचा दौरा पंधरा मिनिटांत आटोपला, हे मोठे आश्चर्य आहे, असे शिरसाट म्हणाले.

 

Web Title :- Ashish Shelar | Those who did not wipe the tears of farmers in two and a
half years, are now touring, Ashish Shelar’s attack on Uddhav Thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा