Ashish Shelar | ‘उद्धव ठाकरे आता विचारांनी काँग्रेसवासी होण्याच्या दिशेने…’, आशिष शेलारांचा घणाघात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नव्या संसद भवनाचे उद्घाटन (New Parliament Building Inauguration) आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेसह इतर विरोधी पक्षांनी बहिष्कार (Boycott) टाकला होता. यावरुन सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. भाजप मुंबई अध्यक्ष (BJP Mumbai President) आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर (Shivsena) टीकेचे बाण सोडले आहेत. आज स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar) यांच्या जयंतीनिमित्त आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सावरकर स्मारकात अभिवादन केले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

 

आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले, काँग्रेसमध्ये (Congress) राहून आता उद्धवजींच्या शिवसेनेनेसुद्धा सावरकरांच्या जन्मदिवशी होत असलेल्या उद्घाटनावर बहिष्कार घातला. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिलीच. पण उद्धव ठाकरे आता विचारांनी काँग्रेसवासी होण्याच्या दिशेने चालले आहेत. सावरकर यांच्या जन्मदिवशी सुद्धा मोठ्या सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे याच्या भयंकर वेदना आणि दु:ख आम्हाला आहे, असं आशिष शेलार म्हणाले.

नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याचे आमंत्रण नसल्याचा आरोप केला जात आहे.
यावर आशिष शेलार म्हणाले, आमंत्रण सगळ्यांना दिलं. पण असं बोलल्याने मतं मिळतील असं त्यांना वाटतं.
लोकशाही धोक्यात आली असेल तर सामनाने कर्नाटकच्या निवडणुका (Karnataka Elections) परत घ्या असं म्हणाव.
त्यांनी निवडणूक आयोगाकडे (Election Commission) मागणी करावी की, आम्ही कर्नाटक निवडणूक जिंकलो
ती हुकूमशाहीने, ठोकशाहीने, थैलीशाहीने जिंकलेलो आहोत. त्यामुळे कर्नाटकचा निर्णय आम्हाला मान्य नाही.
त्यामुळे कर्नाटकच्या निवडणुका पुन्हा घ्या, असं ते म्हणाले तर लोकशाहीवर त्यांचा विश्वास आहे की नाही हे जनतेला समजले, असंही शेलार म्हणाले.

 

 

Web Title :  Ashish Shelar | uddhav thackeray ignored balasahebs thoughts now congressmen ashish shelars attack

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा