आशिष शेलारांनी दिला शिवसेनेला ‘हा’ इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीतून भारतीय जनता पक्षानं माघार घेतली आहे. महापौर निवडून आणण्यासाठी अपेक्षित संख्याबळ नसल्यानं या निवडणुकीत अर्ज न देण्याचा निर्णय भाजपनं घेतला आहे. मात्र मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा स्वतंत्र लढणार आहे असे संकेत भाजपाकडून देण्यात आले आहेत. 2022 चा मुंबईचा महापौर स्वबळावर आणि संख्याबळावर असणार आहे असा ईशारा भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला दिला आहे.

आशिष शेलार यांनी ट्विटरवर म्हंटले आहे की, ‘मुंबई महापालिकेत आम्ही आता तुल्यबळ आहोत…मात्र संख्याबळ नाही. विरोधी विचारांच्या जीवावर आता अभद्र करणार नाही… मात्र 2022 चा मुंबईचा महापौर स्वबळावर.. आणि संख्याबळावरही!’

22 नोव्हेंबरला मुंबईच्या महापौर पदासाठी निवडणूक होईल. त्यासाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. सध्या मुंबईचे महापौर शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर हे आहेत. त्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यानंतर होणाऱ्या निवड प्रक्रियेत भाजपकडून महापौरपदासाठी उमेदवार उतरणार नसल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. राज्यातील सत्तावाटपाच्या मुद्द्यावरून भाजप-शिवसेनेची युती तुटली आहे. काल शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढल्याची अधिकृत घोषणाच भाजपनं केली आहे. शिवसेना-भाजप युती तुटल्याने, भाजपकडून महापौरपदासाठी उमेदवार देण्याची चर्चा होती. मात्र भाजपने मुंबई महापौरपदाची निवडणूक लढणार नाही अशी घोषणा केली आहे.

Visit : Policenama.com