राज्यातील गुन्हेगारीलाही स्थगिती द्या ! भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यानं दिलं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – हैदराबादमध्ये महिलेवर बलात्कार आणि हत्या प्रकरण झाल्यानंतर राज्यातील गुन्हेगारीलाही आळा घाला अशा आशयाचे पत्र भाजपचे नेते अशिष शेलार यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना देण्यात आले आहे. यासंबंधित ट्विट अशिष शेलार यांच्याकडून करण्यात आले आहे. यात राज्यातील गुन्हेगारीलाही स्थगिती द्या अशी मागणी करण्यात आली आहे.

अशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना देण्यात आलेले पत्र ट्विट केले आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की गेल्या 10 दिवसात राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून मुलींवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करा, राज्यातील गुन्हेगारीला ही स्थगिती द्या !

https://twitter.com/ShelarAshish/status/1204352573916041216

या पत्रात अशिष शेलार यांनी, राज्यातील अस्थिरतेचा फायदा तर गुन्हेगार घेत नाहीत ना ? राज्यात सरकार स्थापन झाले तरी खातेवाटप नाही यामुळे पोलीस यंत्रणांचे गुन्हेगारांकडे दुर्लक्ष तर झाले नाही ना ? असे प्रश्न उपस्थित केले आहेत.

https://twitter.com/ShelarAshish/status/1204352683244740610

या पत्रात त्यांनी नागपूर, विरार, कल्याण, मुंबई, वाकोला, ठाणे, जळगाव या ठिकाणी घडलेल्या गुन्ह्यांची माहिती दिली आहे. राज्यात खून, विनयभंग, बलात्कार, चोऱ्या अशा गंभीर स्वरुपाच्या घटनामुळे जनतेमध्ये भीती पसरत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली आहे की, या घटनांकडे तातडीने लक्ष देऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात, जनतेतील भीतीचे वातावरण कमी करण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात.

राज्यातील विविध प्रकल्पांना ठाकरे सरकार आल्यानंतर स्थगिती देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील गुन्हेगारीलाही स्थगिती द्या असे खोचक ट्विट अशिष शेलारांकडून करण्यात आले.

Visit : Policenama.com 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like