अभिनेते आशीष विद्यार्थी यांना कोरोनाची लागण (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोना महामारीत हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या विळख्यात अनेकजण सापडले आहेत. यात कोणीही सुटले नाही. रणबीर कपूर, संजय लीला भंसाळी आणि मनोज वाजपेयी यांच्यानंतर आता प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते आशीष विद्यार्थी यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर दिल्लीच्या मॅक्स रुग्णालयात उपचार सुरु आहे. इन्स्टाग्राम व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनीच हि माहिती दिली. या व्हिडिओमध्ये ते म्हणाले की, थोडासा अशक्त असल्यासारखे काल वाटू लागल्याने मी कोरोना चाचणी करुन घेतली. या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्यावर मॅक्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एक विनंती आहे, माझ्या सम्पर्कात आलेल्या व्यक्तींनी देखील स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी. माझी प्रकृती स्थिर आहे. काळजी करु नये.” अशा आशयाचा संदेश त्यांनी या व्हिडीओद्वारे दिला.

महाराष्ट्रातील कोरोनास्थिती चिंताजनक
कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असुन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी महाराष्ट्रात दैनंदिन रुग्णवाढीबाबत चिंता व्यक्त केली. निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही. के. पॉल म्हणाले, राज्यातील परिस्थिती गंभीर बनू लागली असून नमुना चाचण्या वाढवण्याची गरज आहे. राज्यातील सद्य परिस्थितीवरून कोरोनाबाबत कोणताही निष्काळजीपणा धोकादायक ठरू शकत. त्यामुळे अन्य राज्यांनीही दक्ष राहावे, असा इशारा त्यांनी दिला आहे.