काय सांगता ! होय, सई ताम्हणकरच आहे ‘सविता भाभी’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अलीकडेच पुण्यात सविता भाभी… तू इथंच थांब असे अनेक होर्डिंग पाहायला मिळाले. या होर्डिंनंतर अनेक प्रश्न समोर येताना दिसले. हे होर्डिंग कोणी लावले आहेत? हे होर्डिंग कसले आहेत आणि का लावले आहेत? असे अनेक प्रश्न समोर येतान दिसले. याचा खुलासा आता झाला आहे. अभिनेत्री सई ताम्हणकर हीच सविता भाभी आहे. अश्लील उद्योग मित्र मंडळ या तिच्या आगामी सिनेमातील तिच्या पात्राचं नाव सविता भाभी आहे. सध्या या सिनेमाचा ट्रेलर समोर आला असून ट्रेलरची चर्चा होताना दिसत आहे.

अभय महाजन, पर्णा पेठे, सई ताम्हणकर हे कलाकार अश्लील उद्योग मित्र मंडळ सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. याशिवाय सायली पाठक, अक्षय टांकसाळे, ऋतुराज शिंदे, केतन विसाळ, विराट मडके, अमेय वाघ हे कलाकारही सिनेमात दिसणार आहेत. parna petheनं या सिनेमाचं डायरेक्शन केलं आहे. सध्या सिनेमाच्या ट्रेलरवरून अनेक अंदाज लावले जाताना दिसत आहेत. तसंही ट्रेलर पाहून सिनेमाच्या स्टोरीचा काहीसा अंदाज येतो आहे.

सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर सई ताम्हणकर सिनेमात सविता भाभीच्या रोलमध्ये आहे. ट्रेलरच्या सुरुवातीलाच तिच्या रोलची ओळख करून देण्यात आली आहे. ट्रेलरमुळे चाहत्यांची सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखीच वाढली आहे. 6 मार्च 2020 रोजी हा सिनेमा रिलीज केला जाणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like