अशोक चव्हाण यांचे समर्थक नांदेडचे गोल्डमॅन गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळीबार ; नांदेड मध्ये नाकाबंदी

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते तथा पदमशाली युवक संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष तसेच नांदेडचे गोल्डमॅन गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. नांदेड शहरातील चौफाळा भागात त्यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर शनिवारी (१७ ऑगस्ट २०१९) सायंकाळी सहाच्या सुमारास गोविंद कोकुलवार त्यांच्या पाठीवर अज्ञात हल्लेखोराने गोळी झाडली. या हल्यात कोकुलवार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने नांदेडमधील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कोकुलवार यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना मुंबईला हलवण्याची तयारी सुरु आहे.

प्राथमिक मिळालेली माहिती अशी की, गोवींद कोकुलवार हे शनिवारी सायंकाळी चौफाळा भागात त्यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर आले असता दूचाकीवर आलेल्या अज्ञात हल्लेखोराने त्यांच्या पाठीवर जवळून गोळी झाडली. नंतर हल्लेखोर पसार झाला. दरम्यान, या घटनेनंतर चौफाळा भागात तणाव पसरला आहे.

काही दिवसांपूर्वी गोविंद कोकुलवार यांना खंडणीसाठी धमकी आल्याची देखील माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. दरम्यान, यापूर्वी शहरात दोन व्यापाऱ्यांवर देखील गोळीबार झाल्याच्या घटना घडल्या होत्या.
Ashok-Chavhan

अशोक चव्हाणांनी गोल्डमॅन गोविंद कोकुलवार यांची भेट घेतली. गोविंद कोकुलवार हे अत्यवस्थ असून त्यांना मुंबईला हलवण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –