Ashok Chavan | बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न; काँग्रेसनेते अशोक चव्हाण यांनी घेतला मनधरणीसाठी पुढाकार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Ashok Chavan | पदवीधर मतदारसंघातील निवडणुकांमुळे काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत, त्यांची आणि बाळासाहेब थोरातांची (Balasaheb Thorat) बदनामी करण्यासाठी प्रयत्न केले जात होते. असा आरोप सत्यजीत तांबे यांनी राज्यातील काँग्रेसवर केला होता. त्यानंतर आपला विधीमंडळ पक्षनेतेपदाचा बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या सर्व घडामोडींवर काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले, ‘ बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याबद्दल आत्ताच कळलं असून त्यांचा राजीनामा ही दुर्दैवी बाब आहे. आज थोरात यांचा वाढदिवस असून सकाळीच मी त्यांना शुभेच्छा दिल्या. थोरात यांची मनधरणी करण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे. काँग्रेस (Congress) पक्ष वाढीसाठी सर्व काही करणार आहे.’ असे यावेळी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले. तसेच थोरात पक्ष सोडून जाणार नाहीत, असा देखील विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याने महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले असून सर्वत्र
बाळासाहेब थोरात यांच्याच राजीनाम्याची चर्चा सुरू आहे.
आज बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस असून याच दिवशी त्यांनी राजीनामा दिल्यामुळे याची चर्चा अधिक होतेय.
ते दुसऱ्या पक्षात तर जाणार नाहीत ना? असे कयास देखील जाणकारांकडून बांधले जात आहेत. तर यावर भाजपचे दरवाजे येणाऱ्यांसाठी सदैव खुले असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले.

Web Title :- Ashok Chavan | ashok chavan comment on balasaheb thorat resignation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrashekhar Bawankule | बाळासाहेब थोरात यांना भाजपमध्ये प्रवेश देणार का? यावर स्पष्टचं बोलले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे; म्हणाले…

Balasaheb Thorat | काँग्रेसचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर; काँग्रेसनेते बाळासाहेब थोरांत यांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा?

Onkar Bhojane | अभिनयाच्याबाबतीत ओंकार भोजनेने दिले स्पष्टीकरण; म्हणाला – ‘मला पटलं नाही तर…’