Ashok Chavan | संजय शिरसाट यांच्या ‘त्या’ विधानावर अशोक चव्हाण यांचं सूचक विधान, म्हणाले…

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Shinde Group MLA Sanjay Shirsat) यांनी काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्याबाबत मोठा दावा केला होता. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण (Ashok Chavan) भाजपमध्ये (BJP) प्रवेश करतील असा गौप्यस्फोट शिरसाट यांनी केला होता. यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय (Maharashtra Politics News) वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

 

शिरसाट यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर स्वत: अशोक चव्हाण यांनी खुलासा केला आहे. संजय शिरसाट यांच्या कोणत्याही वक्तव्याची दखल घ्यायला पाहिजे, असे मला वाटत नाही. तेत्या काळात संजय शिरसाट यांनाच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेत (Shivsena) जाण्याशिवाय पर्य़ाय नाही, असं विधान अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केले आहे. ते नांदेड येथे पत्रकारांशी बोलत होते.

 

ते भविष्यकार आहेत का?
संजय शिरसाट यांनी केलेल्या दाव्यासंदर्भात अशोक चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले, संजय शिरसाट हे भविष्यकार आहेत का? शिरसाट यांच्या कोणत्याही वक्तव्याची फार दखल घ्यायला पाहिजे, असं मला वाटत नाही. दुसरा मुद्दा असा की, त्यांना मंत्रिमंडळात घेतले जात नाही, हे निश्चितच झालं आहे. या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) होतच नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही, त्यामुळे त्यांच्याकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेल्याशिवाय पर्याय नाही, ते लवकरच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जातील, असा दावा अशोक चव्हाण यांनी केला.

काय म्हणाले संजय शिरसाट?
काँग्रेसमध्ये एकवाक्यता नाही, अशोक चव्हाण आणि बाकीच्या नेत्यांचं पटत नाही, त्यांना काँग्रेसमध्ये चांगली वागणूक मिळत नाही.
त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निडणुकीपूर्वी (Lok Sabha Election-2024) अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील.
अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये जाण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी अनेक घडामोडी घडल्या आहेत,
असा गौप्यस्फोट संजय शिरसाट यांनी केला.

 

Web Title :- Ashok Chavan | ashok chavan on sanjay shirsat about rejoining uddhav thackeray group nanded

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shambhuraj Desai | ‘बाळासाहेब ठाकरेंना कुटुंबापुरते मर्यादित ठेऊ नका’, शंभूराज देसाईंची उद्धव ठाकरेंवर टीका

Chandrashekhar Bawankule | अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशावर बावनकुळेंचे सूचक वक्तव्य, म्हणाले…

Uday Samant | चालकाचे नियंत्रण सुटलं अन्…, उद्योगमंत्री उदय सामंत आणि छत्रपती संभाजीराजेंच्या बोटीला अपघात