अशोक चव्हाण यांनी विचारला ‘हा’ प्रश्न ; सभागृहात एकच खळबळ

भोकर : पोलीसनामा आॅनलाइन (माधव मेकेवाड) – पं.स.सभागृहात शनिवारी सकाळी पाणी टंचाई निवारण उपाययोजना व नियोजन आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी बैठकीचा इतिव्रतांत कोण लिहित आहे ? असा प्रश्न अशोक चव्हाण यांनी विचारला असता, इतिवृतांत लिहणारा कर्मचारीच अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले. इतिवृतांत लिहणाऱ्या कर्मचाऱ्यास उपस्थित करा तोपर्यंत बैठक थांबवतो असे चव्हाण म्हणताच सभागृहात एकच खळबळ उडाली. त्यामुळे भोकर पंचायत समितीचा गलथान कारभार समोर आला आहे.

२ कोटी ४९ लाखाचा पाणी टंचाई आराखडा मंजूर करण्यात आलेल्या बैठकीत इतिव्रतांतच लिहिला नाही.

यावेळी बैठकीला आ.अमिताताई चव्हाण, जि.प.सदस्य प्रकाश भोसीकर, बाळासाहेब रावणगावकर, दिवाकर रेड्डी  सूरकूंटवाड, संतोष पांडागळे, जगदिश पा.भोसीकर, बाबूराव सायाळकर, तहसीलदार व्यंकटेश मूंडे, विज मंडळाचे कार्यकारी अभियंता सिध्दार्थ रसाळ, उपअभियंता शेख ,पा.पू.उपविभागीय अभियंता सरनाईक, पं.स.सभापती झिम्माबाई गूलाब चव्हाण, आदि उपस्थित होते.

तालूक्यातील अनेक गावात आतापासूनच पाणीटंचाई निर्माण झाल्याने ग्रामीण भागातील नागरीकांनी आढावा बैठकित प्रश्न पाण्याचा उपस्थित केला. काहि गावात रोहित्र बंद अवस्थेत असल्याने विज नाही. अशा अनेक समस्या खा.अशोक चव्हाण व आ.अमिताताई चव्हाण यांच्या समोर मांडण्यात आल्या. तेंव्हा खा.चव्हाण यांनी लगेच विजमंडळाच्या अधिकार्‍यांना धारेवर धरले. ८ दिवसात रोहित्र बसवा व विजपूरवठा सूरळीत करा. अन्यथा नागरीकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. तसेच ज्या गावात पाणी टंंचाई आहे अशा गावात विहिर अधिग्रहण टँकर द्वारे पाणी पूरवठा करा अशा सुचना अशोक चव्हाण यांनी दिल्या.

जानेवारी ते मार्च या तीन महिन्यासाठी पाणी टंचाईचा पहिला टप्पा २ कोटी ४९ लाखाच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. तालूक्यात ६१ गावे ४० वाडीतांडे असून ज्या गावात पाणीटंचाई निर्माण झाली अशा गावांना पं.स.स्तरावरील अधिकारी कर्मचार्‍यांनी सर्व्हे करुन उपाय योजना कराव्यात, असे चव्हाण यांनी सांगीतले. बैठकिस सर्व गावातील सरपंच उपसरपंच ग्रामसेवक प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.