Ashok Chavan | माझा घातपात घडवण्याचे कारस्थान, अशोक चव्हाणांची पोलिसांकडे तक्रार; राजकीय वर्तुळात खळबळ

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते (Senior Congress Leader) आणि माजी मुख्यमंत्री (Former CM) अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आपल्या बाबतीत घातपात घडविण्याचे कारस्थान दिसून येत असल्याची लेखी तक्रार सोमवारी (दि.20) नांदेड पोलिसांकडे (Nanded Police) केली. अशोक चव्हाण यांच्या तक्रारीमुळे एकच खळबळ उडाली आहे. मंत्रिपदाच्या लेटरहेडचा गैरवापर करुन आपल्या नावाने बनावट पत्रे तयार केली जात असल्याचे अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी तक्रारीत म्हटले आहे.

 

अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे नांदेडमध्ये मुक्कामी असून सोमवारी दुपारी ते धर्माबाद जवळील एका कार्यक्रमाला जाणार होते. त्यापूर्वी त्यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार पांडे (Addl SP Abinash Kumar Pandey) यांची भेट घेऊन तक्रार नोंदवली. स्वत:च्या बाबतीतील एखाद्या प्रकरणात पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष तक्रार नोंदवण्याचा प्रसंग त्यांच्यावर पहिल्यांदाच आला आहे.

याबाबत अशोक चव्हाण यांनी ट्विट करुन माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, मी सार्वजनिक बांधकाम मंत्री (Public Works Department) असतानाच्या काळातील काही शासकीय पत्रे मिळवून अज्ञात व्यक्तींनी त्यातील सही कायम ठेवून व मूळ मजकूर मिटवून बनावट कोरे लेटरहेड तयार केले आहे. या बाबीची कुणकुण मला अगोदरच लागली होती. फक्त स्वाक्षरी असलेले एक कोरे लेटरहेडही मला मिळाले होते.

त्याचप्रमाणे मुंबई आणि नांदेडमध्ये माझ्यावर खासगी वा भाडोत्री व्यक्तींकडून पाळत ठेवली जाते आहे.
सदरहू व्यक्ती पाठलाग करून माझ्या भेटीगाठींची, प्रवासाची माहिती संकलित करीत असल्याचे दिसून येते.
यावरून माझा घातपात घडवण्याचे त्यांचे कारस्थान असावे, अशीही शक्यता आहे.
या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी दखल घेऊन तातडीने कायदेशीर दृष्ट्या योग्य कार्यवाही करावी, अशीही माझी मागणी आहे.

 

Web Title :- Ashok Chavan | complaint of ashok chavan in nanded police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Uddhav Thackeray | ‘… तर 2024 ची निवडणूक शेवटची ठरु शकते’, उद्धव ठाकरेंचं मोठं विधान (व्हिडिओ)

MP Sanjay Raut | संजय शिरसाट यांनी संजय राऊतांची तुलना केली पिसाळलेल्या कुत्र्याशी, म्हणाले – ‘इंजेक्शन द्यावं लागेल’

Pune Crime News | 24 वर्षाच्या तरुणीचा नवले पुलावरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न, पुणे पोलीस आणि नागरिकांमुळे तरुणी बचावली