Ashok Chavan | अशोक चव्हाणांचा चंद्रकांत पाटलांना सणसणीत टोला, म्हणाले – ‘… हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा’

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन महाविकास आघाडी सरकारला (Maha Vikas Aghadi Government) दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. एकीकडे सत्ताधारी जल्लोष साजरा करत असताना दुसरीकडे विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) भाजप प्रदेशाध्यक्ष (BJP State President) चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. याला काँग्रेस (Congress) नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणावरुन आरोप करणे, म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, अशा शब्दांत अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पलटवार केला.

 

महाविकास आघाडी सरकारने मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा (OBC reservation) मुद्दा रखडवून ठेवला असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता.
त्यानंतर अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर नांदेडमध्ये पत्रकार परिषद घेऊन सरकारने दोन वर्षात केलेल्या कमांची माहिती दिली.
यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन चंद्रकांत पाटील यांनी केलल्या टीकेला त्यांनी उत्तर दिले.

 

अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले, याला चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात. चंद्रकांत पाटील यांना मराठा आरक्षणाचा कधीच अभ्यास नव्हता.
आम्ही जेवढ्या गोष्टी दाखवल्या त्याच सर्वोच्च न्यायालयानेही (Supreme Court) नमूद केल्या आहेत.
राज्याला अधिकार नाही, पण भाजपचे लोक अधिकार असल्याचे सांगत होते. त्यांनी तसाच निर्णय घेतला आणि आमचा निर्णय योग्य असल्याचे सांगत आहेत.
अखेर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की, मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारला (Maharashtra Government) नसून केंद्र सरकारला (Central Government) आहे.
असे म्हणत चव्हाण यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर पलटवार केला. तसेच, कोर्टाने स्पष्ट केलं की, 50 टक्क्यांच्यावर आरक्षण देता येत नाही.
परंतु, चंद्रकांत पाटील यांनी लावलेला शोध हा कोणताच अभ्यास न करता आहे, असाही टोला त्यांनी लगावला.

 

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

 

मुख्यमंत्री कोणतीही फाईल वाचल्याशिवाय सही करत नाहीत, मराठा आरक्षणासाठीची भोसले समिती (Bhosle Committee) काय करत आहे.
या सरकारने मराठा आरक्षण रखडवून ठेवले आहे. ओबीसी जनगणनाच्या मागणीवरुन भुजबळ वारंवार खोटं बोलत आहेत. डेटा गोळा करायला राज्यात काय अडचण आहे.
दोन वर्षे झाले दोन दिवसांच्या पुढे अधिवेशन होईना. आमदारांनी काय चपात्या लाटत बसायचं का? असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

 

Web Title : Ashok Chavan | Congress leader and minister ashok chavan slammed chandrakant patil on the issue of maratha reservation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Best Retirement Plans | ‘लाईफ इन्श्युरन्स’ पासून बचतीसह सुरक्षासुद्धा, तयार करा निवृत्तीचा प्लान; जाणून घ्या

केवळ 2 लाखात झीरो डाऊन पेमेंट लोनवर ‘ही’ कंपनी देईल Renault KWID, सोबत मिळेल गॅरंटी-वॉरंटी प्लान

Unique Digital Address Code | लवकरच घराचा पत्ता म्हणून वापरता येईल QR कोड, जाणून घ्या ‘स्कीम’