Ashok Chavan | चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावरुन अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘त्यांना एवढी माहिती कुठून मिळते..’

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन –  Ashok Chavan | भाजपाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) कारवाईबाबत भाष्य केले होते. नांदेडमधील काँग्रेस (Congress) नेत्यांवर ईडीची पुढची कारवाई होईल असं संकेत त्यांनी अप्रत्यक्षपणे दिले होते. दरम्यान त्यांचा रोख हा काॅग्रेस नेते आणि राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्याबद्दल होता. पाटील यांच्या या विधानावर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यावेळी चव्हाण यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे.

अशोक चव्हाण (Ashok Chavan) बोलताना म्हणाले की, चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ED च्या कारवाईचे संकेत दिले होते.
पण, त्यांना ही माहिती कुठून मिळेल हे मला माहिती नाही, ‘निवडणुकीच्या तोंडावर चर्चेत राहण्यासाठी अशी विधान करतात’ असा टोला अशोक चव्हाण यांनी लगावला आहे.
त्याचबरोबर पुढे ते म्हणाले की, ‘त्यांना एवढी माहिती कुठून मिळते हे मला माहिती नाही. मला यावर अधिक भाष्य करायचं नाही.
पण निवडणुकीच्या तोंडावर चर्चेत राहण्यासाठी ते अशी विधान करत असतात.
निवडणुकीच्या काळात त्यांना संभ्रम निर्माण करायचा आहे. असं अशोक चव्हाण म्हणाले.

दरम्यान, नांदेडमध्ये देगलूर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण हे चर्चेचा विषय ठरत आहे.
यामुळे सत्ताधारी आणि विरोधक परस्परास आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत.
दरम्यान, ‘सध्या महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांबाबत अनेक ठिकाणी अश्या गोष्टी सुरू आहेत.
परंतु जे काही लोकशाहीमध्ये जे काही सुरू आहे, ते अपेक्षित नाहीये.
ठीक आहे, त्यांना काय करायचं ते करू द्या, असं देखील अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : Ashok Chavan | congress leader ashok chavan on chandrakant patil indication of eds action say

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | कात्रज तलावाजवळील ‘स्मार्ट पदपथाचे’ काम वर्षभरापासून रखडले; अर्धवट कामावरून नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा

Maharashtra Police | देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्रातील 3 पोलीस स्टेशनचा समावेश

Nandurbar Crime | धक्कादायक ! दुसऱ्या पत्नीसाठी पहिल्या पत्नीला ‘शॉक’ देत जीवे मारण्याचा प्रयत्न