अशोक चव्हाणांना किरायाने नेते आणावे लागतात : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – नांदेडमध्ये महायुतीचा झंझावात एवढा आहे की, अशोक चव्हाणांना किरायाने नेते आणावे लागत आहेत. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज ठाकरे काल मला बसवलेला मुख्यमंत्री म्हणाले. त्याला मुख्यमंत्र्यांनी नांदेडच्या सभेत उत्तर दिलं आहे. मला जनतेनं, मुख्यमंत्र्यांनी बसवलं. तुम्हाला तर घऱी बसवलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या बसवलेला मुख्यमंत्री या विधानावर केलं. नांदेडमध्ये महायुतीचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

नांदेडमध्ये महायुतीचा झंझावात असा आहे. की अशोक चव्हाणांना माणसं भाड्यानं आणावे लागताहेत. त्यांनी मंच, खुर्च्या, माणसं किरायाने आणावे लागले. परंतु त्यांना नेताही किरायानं आणावं लागले. त्या मनसेची काय अवस्था आहे. मनसे आधी होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नंतर झाली मतदार नसलेली सेना. आता झाली उनसे, उमेदवार नसलेली सेना अशा शब्दात त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर केली.

राज ठाकरे जे मनात येईल ते बोलून जातात. मला ते म्हणाले बसवलेला मुख्यमंत्री. परंतु मला जनतेनं बसवलं. मोदींनी बसवलं. तुम्हाला तर जनतेनं घरी बसवलं.

महाराष्ट्राचं पाणी गुजरातला नेण्याचा करार अशोक चव्हाणांनी २००६ ला केला. या पठ्ठ्याने ते पाणी करार रद्द करून परत आणलं. ज्या राज ठाकरेला बेडकासारखा डराव डराव करतो असं म्हणणारे अशोक चव्हाण आता राज ठाकरेला सभेला बोलवत आहेत. अशी टिका त्यांनी केली.