अशोकराव ‘लिडर’ नाही तर ‘डिलर’ आहेत : देवेंद्र फडणवीस

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे लिडर नसून डिलर आहेत अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नांदेड येथील जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी त्यांनी काँग्रेस आणि अशोक चव्हाण यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. यावेळी तेथील युतीचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांना निवडून देण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “अशोक चव्हाण हे लिडर नसून ते एक डिलर आहेत. पेट्रोल, रॉकेल पासून इतर अनेक गोष्टींची डिलरशिप अशोक चव्हाण यांच्याकडे आहे. नांदेडला आता एका डिलरची नाही तर लिडरची गरज आहे. नांदेडला एक चांगला लिडर मिळावा म्हणून आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवे. यासाठी आपण सर्वांनी प्रतापराव चिखलीकर यांना निवडून द्यायला हवे.” असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर निशाणा साधून सडकून टीका केली आहे. काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यावरही त्यांनी हल्ला चढवला आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, “काँग्रेसने जाहीर केलेला जाहीरनामा हा काँग्रेसचा जाहीरनामा आहे की जैश-ए-मोहम्मदचा जाहीरनामा आहे ?” असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस आणि त्यांच्या जाहीरनाम्यावर टीका केली आहे.