म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कॉंग्रेस आमदारांना फोन : अशोक चव्हाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सीएम फडणवीस कॉंग्रेस फोडत आहेत. ते कॉंग्रेस आमदारांना फोन करून पक्षात येण्याची गळ घालत आहेत. असा गौप्यस्फोट कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.

भाजपला लोकसभा निवडणूकांमध्ये भाजपला यश मिळाले. त्यानंतर अनेक आमदार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांना विचारणा केल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कॉंग्रेसच्या आमदारांना फोडत असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.

मुख्यमंत्र्यांचा फोन आला म्हणजे देवाचा फोन वाटतो

काहींना मुख्यमंत्र्‍यांचा फोन आला की देवाचा फोन आल्यासारखं वाटतं. मुख्यमंत्री कॉंग्रेस आमदारांना ते फोन करून फोडत आहेत. असा दावा यांनी केला आहे.

कॉंग्रेस आमदार भाजपात जाणआर नाहीत

क़ॉंग्रेस पक्षातून कोणीही जाणार नाही. मी आमदारांच्या संपर्कात आहे. मी त्यांच्याशी संपर्क केला आहे. कुठलाही आमदार पक्ष सोडणार नाही.परंतु भाजपकडून आमदारांना गळ घालण्याचा प्रकार सुरु आहे.

प्रदेशाध्यांच्या सोबतचेच आमदार भाजपात कधी येतील हे कळणार नाही

अशोक चव्हाण यांच्या त्या वक्तव्यावर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचेच जवळचे आमदार कधी भाजपमध्ये येतील हे त्यांनाही कळणार नाही. आम्ही माणसं फोडत नाही. तर त्यांचीच भाजपमध्ये येण्याची इच्छा आहे. असं गिरीश महाजन म्हणाले.