‘वंचित फॅक्टर’मुळे मतं फुटणार ; काँग्रेसची कबुली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशातील निवडणुका संपल्यानंतर एक्झिट पोल जाहीर करण्यात आले. या पोलनुसार एनडीए पुन्हा सत्तेत येईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर राज्यात एनडीएच्या जागा घटणार असून युपीएच्या जागा वाढण्याची शक्यतात वर्तवण्यात आली आहे. एक्झीट पोलचे अंदाज चुकीचे असून यामध्ये बदल होऊ शकतो असा सूर विरोधकांकडून ऐकण्यास मिळत आहे.

राज्यात वंचित बहुजन आघाडीने आपले उमेदवार उभे कले. वंचित बहुजन आघाडी ही भाजपाची बी टीम असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. वंचितमुळे मतांचे विभाजन झाले असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

एक्झीट पोल विषयी बोलताना ते म्हणाले, राज्यात आणि देशात एक्झिट पोल याआधी चुकले आहेत असे सांगून एक्झिट पोल पेक्षा आम्हाला जास्त जागा मिळतील असा विश्वास त्यांनी वर्तवला आहे. राज्यात आघाडीला २० ते २२ जागा मिळतील.

एक्झिट पोलचे अंदाज चुकीचे
मागील चार निवडणुकांमध्ये जाहीर झालेले एक्झिट पोल चुकीचे ठरले आहेत. त्यामुळे यंदाच्या एक्झिट पोलवर विश्वास ठेवणे कठीण आहे. कारण सर्वांनीच वेगवेगळे भाकित केले आहेत. कोणामध्येही एकवाक्यता नाही. एखादा उमेदवार आज विजयी होणार असे सांगितले जाते तर दुसऱ्या दिवशी हाच उमेदवाराचा पराभव झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आमचा या एक्झिट पोलवर विश्वास नाही.

सत्ताधाऱ्यांकडून दिशाभूल
जाहीर झालेले एक्झिट पोल हे सत्ताधाऱ्यांकडून मॅनेज केले असण्याची शक्यता आहे. विरोधकांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होत असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. अधिकृत निकाल लागण्यासा काही तासांचा अवधी राहिला आहे. त्यामुळे २३ तारखेला दुध का दध और पानी का पानी झाल्याचे समजेल. तसेच येणारा निकाल प्रत्येकाला स्विकारावा लागेल.

Loading...
You might also like