विखे-पाटलांच्या राजीनाम्याबाबत अशोक चव्हाण यांचे महत्वपूर्ण स्पष्टीकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे-पाटील यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर आता राधाकृष्ण विखे पाटील राजीनामा देणार का ? यासंदर्भात राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. पण त्यांच्या राजीनाम्याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ‘काँग्रेसने विखेंचा राजीनामा मागितलाच नाही असे स्पष्टीकरण अशोक चव्हाण यांनी दिलं आहे.

दरम्यान, काँग्रेसकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठीची दुसरी यादी जाहीर झाली आहे. विखे-पाटील राजीनामा देणार की नाही याबाबत लवकरच निर्णय येण्याची शक्यता आहे कारण राधाकृष्ण विखे पाटील आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पत्रकार परिषद घेणार आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा मुलगा सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे विखे पाटीलही आता विधानसभेचे विरोधी पक्ष नेते या पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
राजीनाम्याबाबतचा निर्णय त्यांनी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनाही फोनवरुन कळवल्याची माहिती आहे. मात्र अशोक चव्हाण यांनी काँग्रेसने विखेंचा राजीनामा मागितला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

सुजय विखे-पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश-

सुजय विखे हे गेल्या अनेक दिवसांपासून नगर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात होते. वडील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असल्यानं आपल्याला सहज तिकीट मिळेल, असा त्यांचा अंदाज होता. मात्र, आघाडीच्या जागावाटपात नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडं असल्यानं विखेंना तिकीट मिळवून देण्यासाठी काँग्रेसला अनेक तडजोडी कराव्या लागणार होत्या. राधाकृष्ण विखे यांनीही पुत्रासाठी पक्षाकडं तसा आग्रह धरला होता. मात्र राष्ट्रवादीकडून नगरची जागा देण्यास ठाम नकार देण्यात आला होता.

काँग्रेसकडूनही विशेष प्रतिसाद येत नसल्यानं दरम्यानच्या काळात सुजय यांची भाजपशी बोलणी सुरू होती. या संधीचा फायदा भाजपने बरोबर उचलला. विखे यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध करणाऱ्या स्वपक्षीयांना तातडीनं शांत करण्यात आलं. त्यामुळं सुजय यांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग सुकर झाला. त्यानंतर मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या गरवारे क्लब हाऊसमध्ये सुजय यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

ह्याही बातम्या वाचा –