शिक्षण क्षेत्राचा उपयोग संघ विचारधारेचा प्रसार करण्यासाठी : अशोक चव्हाण

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – नुकतेच नागपूर विद्यापीठाने अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासाचा समावेश करण्याचा एक वादग्रस्त निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे चांगलाच वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घणाघात केला आहे. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राष्ट्रनिर्मितीमध्ये संबंध काय, असा प्रश्न विचारून शिक्षण क्षेत्राचा उपयोग संघ विचारधारेचा प्रसार करण्यासाठी केला जात आहे आणि हे निंदनीय आहे, असं चव्हाण यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात बोलताना चव्हाण म्हणाले की, नागपूर विद्यापीठाने बी.ए. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याचे राष्ट्रनिर्मितीमधील योगदान’ असा विषय समाविष्ट केला आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशातील सगळ्यात मोठी विभाजनकारक शक्ती आहे. या संघटनेचा इतिहास हा पूर्णपणे काळा असून तो खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांसमोर येणे आवश्यक आहे. ब्रिटिशांबरोबर संगनमत करून स्वातंत्र्यसंग्रामाला केलेला विरोध, स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेण्यापासून इच्छुक स्वयंसेवकांना परावृत्त करणे, १९४२ चे चलेजाव आंदोलन हाणून पाडण्याकरता ब्रिटिशांना केलेली मदत, हे संघाच्या देशविरोधी कारवायांचे प्रतीक आहेत. स्वातंत्र्य मिळण्याच्या कालावधीमध्ये संविधानाऐवजी मनुस्मृती ग्रंथाचा केलेला पुरस्कार, भारतीय तिरंगा झेंड्याला अशुभ म्हणून ५२ वर्षे स्वतःच्या कार्यालयावर झेंडा न फडकवणे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य राहिलेले आहे, असेही ते म्हणाले.

आजतागायत RSS वर तीनदा बंदी का घातली हे शिकवा
भारत हा देश धर्मनिरपेक्ष असताना हिंदू राष्ट्राची प्रार्थना खुलेआम केली जाते. खऱ्या अर्थाने जर विद्यार्थांना आरएसएसची माहिती द्यायची असेल तर त्यांच्यावर तीनदा बंदी का घातली गेली, हा अभ्यासक्रमही त्यांनी शिकवावा, असा सवालही चव्हाण यांनी उपस्थित केला. सत्तेचा गैरवापर करून संघाची कितीही भलामण करण्याचा प्रयत्न केला तरीही सत्य लपणार नाही.

आरोग्यविषयक वृत्त

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सावधान ! तांब्याच्या भांड्यात ठेवलेले ‘हे’ पदार्थ बनतात विषारी

माश्या, चिलटांना घरापासून दूर ठेवण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘ही’ फळे दुधासोबत खाणे आरोग्याला नुकसानकारक

चुकीच्या वेळी ‘नारळ पाणी’ पिणे आरोग्यास ‘घातक’ ; जाणून घ्या

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like