सोनिया गांधींची अशोक चव्हाणांबाबत ‘ही’ इच्छा, पण…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मध्य प्रदेशचे प्रभारी बनावे अशी इच्छा काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्यक्त केली होती, परंतू अशोक चव्हाण यांनी याला नकार देत राज्यात राहून पक्षासाठी काम करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. अशोक चव्हाण यांनी 31 ऑगस्टला अध्यक्षा सोनिया गांधींना फोन करुन सांगितले की, मला दिल्लीचे राजकारण करायचे नाही, मी राज्यातच पक्षासाठी काम करेन.

दीपक बाबरिया यांच्या जागी मध्य प्रदेशचे प्रभारी म्हणून अशोक चव्हाण यांना प्रभारी पदाची जबाबदारी देण्याचा सोनिया गांधींचा इरादा होता. मात्र अशोक चव्हाण यांनी आपल्याला राज्यातच काम करायला आवडेल, असे सांगून सोनिया गांधींना नकार कळवला. चव्हाण म्हणाले की, आता महाराष्ट्रात निवडणूक आहेत आणि मी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नसलो तरी मी राज्यात राहूनच पक्षासाठी काम करेन.

लोकसभेत पराभव झाल्यानंतर राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरुन अशोक चव्हाण देखील पायउतार झाले होते. त्यांच्या जागी बाळासाहेब थोरात यांच्याकडे राज्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सोनिया गांधींच्या मते अशोक चव्हाण हे महाराष्ट्रातील बडे राजकीय नेते आहेत. त्यांना दिल्लीत आणून त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल.

आरोग्यविषयक वृत्त –