किंमत चुकवावी लागली तरी चालेल पण ‘हे’ खपवून घेणार नाही, काँग्रेसचा शिवसेनेला इशारा (व्हिडीओ)

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्याबद्दल काँग्रेस नेत्यांनी नाराजी प्रकट केली होती. त्यानंतर आता काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी कितीही मोठी किंमत चुकवावी लागली तरी चालेले पण इंदिरा गांधीबद्दल अपशब्द खपवून घेतले जाणार नाहीत, अशा शब्दात थेट शिवसेनेला इशारा दिला आहे. अशोक चव्हाण यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर एक व्हिडिओ पोस्ट करून संजय राऊत यांच्या विधानाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्याविषयी संजय राऊत यांनी चुकीची विधाने केली आहेत. स्व. इंदिरा गांधी यांचे देशप्रेम सर्वश्रृत आहे. त्याविषयी शंका घ्यायला देखील वाव नाही. एक कर्तबगार नेत्या म्हणून संपूर्ण जगामध्ये त्यांच्याबद्दल मोठा आदर आहे. त्यामुळे त्यांच्या बद्दल चुकीची विधाने करणे अयोग्य आहे. कितीही मोठी किंमत चुकवावी लागली तरी चालेल, पण त्यांच्याबद्दल अपशब्द आम्ही खपवून घेणार नाही. महापुरूषांबद्दल, देशाच्या माजी पंतप्रधानांबद्दल विधाने करताना आघाडीतील सर्व सहकाऱ्यांनी तारतम्य बाळगले पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे.

Geplaatst door Ashok Chavan op Donderdag 16 januari 2020

माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्याविषयी संजय राऊत यांनी चुकीचे विधान केले आहे. इंदिरा गांधी यांचे देशप्रेम सर्वांना माहीत आहे. संजय राऊत यांनी चुकीचे विधान केले आहे. त्याविषयी शंका घ्यायला देखील वाव नाही. एक कर्तबगार नेत्या म्हणून संपूर्ण जगामध्ये इंदिरा गांधी यांच्याबद्दल मोठा आदर आहे. त्यामुळे त्यांच्या बद्दल चुकीचे विधाने करणे योग्य नाही. कितीही मोठी किंमत चुकवावी लागली तरी चालेल, पण त्यांच्याबद्दल अपशब्द आम्ही खपवून घेणार नसल्याचा इशारा अशोक चव्हाण यांनी दिली आहे. तसेच महापुरुषांबद्दल, देशाच्या माजी पंतप्रधानाबद्दल विधाने करताना आघाडीतील सर्व सहकाऱ्यांनी तारतम्य बाळगले पाहिजे, अशी अपेक्षा आहे, असे आवाहनही अशोक चव्हाण यांनी केले आहे.

दरम्यान, इंदिरा गांधी या देशाच्या सर्वोच्च नेत्या होत्या. प्रभावशाली नेत्या, प्रखर राष्ट्रभिमानी नेत्या होत्या. आमच्याकडून इंदिरा गांधी यांची प्रतिमा भंग होईल असे कोणतेही वक्तव्य केलेलं नाही. तरीही कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे वक्तव्य मागे घेतो, अशा शब्दांत संजय राऊत यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like