अशोक चव्हाणांचा प्रदेशाध्यपदाचा राजीनामा मंजूर ; प्रदेशाध्यक्ष पदासाठी ‘या’ नेत्याच्या नावाची चर्चा

दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पदाचा राजीनामा दिला. काँग्रेसने त्यांचा राजीनामा स्विकारला असून त्यांच्या जागी बाळासाहेब थोरात यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्विकारून अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

प्रदेशाध्यक्षपदाची माळ बाळासाहेब थोरात यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये राजीव सातव यांचे नाव देखील असल्याने प्रदेशाध्यक्षपद कोणाला मिळते हे पहावे लागेल. मात्र बाळासाहेब थोरात यांच्या नावाला पसंती मिळत असून त्यांच्या नावाची घोषणा लवकरच करण्यात येईल असे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान दिल्ली येथे अखिल भारतीय काँग्रेसच्या बैठकीत बाळासाहेब थोरात यांच्या नवावर सहमती झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसमध्ये अनेक मोठ्या घडामोठी होत आहेत. पराभवाची जबाबादारी स्विकारून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा देणार असल्याच्या आपल्या निर्णयावर ठाम आहेत. लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर काँग्रेसने विधानसभेची तयारी सुरु केली आहे. राज्यात राष्ट्रवादी सोबत आघाडी करून वंचित बहुजन आघाडीला देखील काँग्रेस सोबत घेण्याची शक्याता आहे. विधानसाभा निवडणूक काँग्रेससाठी महत्वाची असणार आहे.

सुंदर दिसायचय ? ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा

‘झटपट मेकअप’ करण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स

विना परवाना शेकडो खड्डे खोदल्याने नगर परिषदेचा समोर आला गलथान कारभार

पोट आणि कंबर अधिक आकर्षक करण्यासाठी करा’स्ट्रेचिंग’

किडनी आणि ह्रदय विकारावर द्राक्ष आहेत गुणकारी