राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत काँग्रेसचे नवे अध्यक्ष ! लवकरच होणार घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेत मानहानीकारक पराभव झाल्यानंतर काँग्रेसमध्ये अनेक घटना पाहायला मिळाल्या. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेतील पराभवासाठी स्वतःला दोषी म्हणत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राजस्थानचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते अशोक गेहलोत यांना राहुल गांधीच्या जागेवर नवीन अध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता आहे.

काँग्रेसकडून मिळालेल्या माहितीनुसार, अशोक गेहलोत यांच्या नावावर शिक्का मोर्तब झाला आहे. आता फक्त अधिकृत घोषणा करण्याचे बाकी आहे. परंतु गहलोत एकटे अध्यक्षपदी असणार आहेत का त्यांच्यासोबत कार्यकारी अध्यक्ष असतील हे अद्याप स्पष्ट् झालेले नाही.

अशोक गेहलोत यांचे नाव समोर आल्याने काँग्रेसचे नवे अध्यक्ष हे गांधी परिवारातील नसतील हे स्पष्ट झाले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या अहवालानुसार, काँग्रेस लवकरच आपल्या अध्यक्षांचे नाव जाहीर करणार आहे.

दरम्यान, गहलोत यांनी बुधवारी राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि पक्षाचे अध्यक्षपदी राहण्याची मागणी केली होती. परंतु राहुल गांधी यांनी या पक्षाच्या अध्यक्षपदावर राहण्यात रस नसल्याचे सांगितले होते. तसंच प्रियंका गांधी यांचे नावही त्याजागेसाठी विचारात घेतले जाणार नाही, असंही राहुल गांधी यांनी सांगितले होते.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गांधी परिवाराला नेहमी घराणेशाहीच्या मुद्द्यावरून घेरले आहे. त्यामुळेच की काय राहुल गांधींनी हा निर्यण घेतला असवा, ज्याने घराणेशाहीचा मुद्दाच नष्ठ होईल.

आरोग्यविषयक वृत्त –

तेजस्वी डोळ्यांसाठी गुणकारी औषधी वनस्पतींचा वापर

डोकेदुखीची वेदना एक…परंतु, कारणे असू शकतात वेगवेगळी

दुधी भोपळ्याची भाजी खाल्ल्यास दूर पळतील अनेक आजार

प्राचीन ग्रंथांमध्ये सूखी वैवाहिक जीवनासाठी सेक्ससंबंधी शास्त्रीय माहिती