पाकिस्तानातून आलेल्या ‘या’ संकटामुळं सरकार ‘घाबरलं’, सीमेवर अधिकार्‍यांची फैज ‘तैनात’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या राजस्थानचे सरकार एकाच विवंचनेत असून सध्या पाकिस्तानमधून येणाऱ्या नाकतोडांच्या झुंडीच्या समस्येवर काम करत आहे. बाडमेर जिल्ह्यातील शेतीत कृषि विभागाची सर्व फौज उतरली आहे. आतपर्यंत भारत पाकिस्तानच्या सीमेवरील २८ जिल्ह्यांमध्ये या नाकतोड्यांमुळे भितीचे वातावरण आहे. तर बाडमेर प्रशानसन सर्व परिस्थीती नियंत्रणात असल्याचे सांगत आहे. पश्चिम राजस्थान सध्या या समस्येवर काम करण्यात गुंतले आहे.

या नाकतोड्यांची संख्या कोटींमध्ये आहे. त्याच्या परिणाम पिकांवर होऊ शकतो. त्यामुळे अशोक गहलोत यांनी कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांना या समस्येवर काम करण्यासाठी गावांमध्ये जायला सांगितलं आहे. त्यामुळे अनेक अधिकारी बाडमेरच्या गावांमध्ये दाखल झाले आहेत. ते या समस्येवर काम करत आहेत. ही समस्या कोठेही असल्यावर तेथे हे अधिकरी जाऊन किटकनाशकांचा छिडकाव करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनुसार हे किटकनाशक फवारल्याने अधिक काळ हे नाकतोडे त्या जागेवर जात नाहीत आणि ते तिथे वाढूही शकत नाहीत. तसंच सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, ११९४ मध्ये ही समस्या राजस्थानमधील शेतकऱ्यांसमोर आली होती. त्यानंतर आता या समस्येने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. सरकार परिस्थिती आटोक्यात असल्याचे जरी सांगत असतील तरी शेतकऱ्यांमध्ये या समस्येची भिती दिसून येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like