केडगावच्या उपसरपंचपदी अशोक हंडाळ यांची बिनविरोध निवड

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यातील महत्वाचे गाव समजले जाणाऱ्या केडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी विद्यमान आमदार राहुलदादा कुल यांचे विश्वासू कार्यकर्ते अशोक पंढरीनाथ हंडाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केडगावचे सरपंच अजित शेलार आणि ग्रामविकास अधिकारी संदीप लांडगे यांनी केली.

माजी उपसरपंच श्रीमती अनिता शेळके यांचा ठरलेला उपसरपंच पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. यावेळी उपसरपंच पदासाठी अशोक हंडाळ हे इच्छुक होते परंतु ऐनवेळी माजी आमदार रमेश थोरात यांच्या गटाचे सदस्य नितीन कुतवळ यांनी आपला उपसरपंच पदाचा अर्ज दाखल केल्याने थोडावेळ उत्सुकता निर्माण झाली होती परंतु त्यांनी आपला अर्ज माघारी घेतल्याने अशोक हंडाळ यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.

या निवडीवेळी भीमा पाटस कारखाण्याचे विद्यमान संचालक आप्पासाहेब हंडाळ, माजी संचालक किरण देशमुख, माजी जिप सदस्य बाळासो कापरे, केडगावचे सरपंच अजित शेलार, माजी उपसरपंच अनिता शेळके, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते के. के.गायकवाड, शिवाजी सुळ, तंटामुक्ती अध्यक्ष पिरतु सुळ, शहाजी गायकवाड, नारायण राऊत, अंकुश शेळके, संदीप गायकवाड, प्रमोद निंबाळकर, ग्रामविकास अधिकारी लांडगे, डॉ. ज्ञानदेव शेळके, बंडू शेळके, पंढरीनाथ बंडोबा गायकवाड, विठ्ठल शेंडगे हे उपस्थित होते.

फेसबुक पेज लाईक करा –