अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेंचा एका जिद्दीचा अनोखा ‘प्रवास’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जगण्याची शर्यत प्रत्येकाला जिंकायची असते. अशा शर्यतीत सहभागी होण्यासाठी प्रत्येकजण धावतही असतो. पण, अनेकदा धावता धावता आपण जगणंच विसरून जातो. किती जगावं, यापेक्षा कसं जगावं हे आपल्याच हाती असतं. सकारात्मक व वेगळा विचार जगण्याच्या लढाईत आपल्याला पुढे नेऊ शकतो आणि इतरांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो हे सांगू पाहणारा ओम छंगानी फिल्म्स निर्मित एका जिद्दीचा अनोखा ‘प्रवास’ ३१ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे, अशी माहिती चित्रपटाचे लेखक – दिग्दर्शक शशांक उदापूरकर यांनी पत्रकार परिषेदत दिली. यावेळी सुप्रसिद्ध अभिनेता अशोक सराफ, सुप्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे उपस्थित होते.

शशांक उदापूरकर म्हणाले की, मनालीमध्ये उणे १८ डिग्रीमध्ये शूटिंग करत असताना प्रतिकूल परिस्थितीत वेळेत काम व्हावे व सर्वोत्कृष्ट व्हावे यासाठी अशोक व पद्मिनीजी प्रयत्नशील होते. अशोकमामा ज्यांनी मागील २० – २५ वर्षांपासून कार चालवणे सोडून दिले होते. या चित्रपटासाठी त्यांनी त्यांच्या भूमिकेला गरज असल्यामुळे मुंबईतील गर्दीच्या रस्त्यावर कार चालवली. प्रत्येक कलाकाराने चांगल्या पद्धतीने आपल्या भूमिका साकारून ‘जे शेष आहे, ते विशेष आहे’ याचीच प्रचिती देत जणू सिनेमाच्या आशयाला खरं करत त्यांच्या जीवन प्रवासाच्या सफलतेचे उदाहरण दिले.

पुढे ते म्हणाले की, ‘जे शेष आहे ते विशेष आहे’ असं आयुष्याचे मर्म सांगणाऱ्या ‘प्रवास’ चित्रपटात अभिजात इनामदार व लता इनामदार या जोडप्याच्या आनंददायी प्रवासाची गोष्ट उलगडणार आहे. नात्यांचे वेगवेगळे कंगोरे हा चित्रपट अधोरेखित करतो. सरळमार्गी आयुष्य जगणारे अभिजात इनामदार आयुष्याच्या एका टप्प्यावर स्वत:चा असा वेगळा निर्णय घेतात. हा निर्णय त्यांच्या आयुष्याला व त्यांच्या कुटुंबाला कशी कलाटणी देणार? हे दाखवतानाच, लढत राहण्यातच खरी मजा असते हाच खरा ‘प्रवास’ असतो तो ज्याचा त्याने ठरवायचा आणि करायचा हा विचार नकळतपणे देऊन जातो. हे या चित्रपटात दाखविले गेले आहे.

चित्रपटातील संगीताची खासियत म्हणजे याचं ऑर्केस्ट्रेशन झेक प्रजास्ताकाची राजधानी प्रागमध्ये करण्यात आले आहे. या निमित्ताने बॉलीवूड संगीतकार सलीम – सुलेमान, गायक सोनू निगम आणि गीतकार गुरु ठाकूर हे कलेच्या प्रांतातील तीन गुणी कलावंत एकत्र आले आहेत. सोनू निगम, श्रेया घोषाल, सुखविंदर सिंग, हरीहरन या आघाडीच्या गायकांचा स्वरसाज या गीतांना लाभला आहे.

चित्रपटात अशोक सराफ व पद्मिनी कोल्हापुरे यांच्यासोबत विक्रम गोखले, रजत कपूर, शशांक उदापूरकर आदि कलाकार आहेत. चित्रपटाच्या लेखनाची व दिग्दर्शनाची जबाबदारी शशांक उदापूरकर यांनी सांभाळली आहे. छायांकन सुरेश देशमाने यांचे आहे. कलादिग्दर्शक महेश साळगांवकर तर संकलन संजय सांकला यांचे आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. रंगभूषा श्रीकांत देसाई तर वेशभूषा ताशीन अन्वारी, दिप्ती सुतार यांची आहे. पवन पालीवाल कार्यकारी निर्माते आहेत. अनिल थडानी या चित्रपटाचे वितरक आहेत.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !