Ashraf Ghani | ‘कॅश’ने भरलेल्या 4 कार आणि हेलिकॉप्टर घेऊन काबुलमधून पळाले राष्ट्रपती अशरफ गनी : रिपोर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Ashraf Ghani | तालिबानच्या भितीने अफगाणिस्तान सोडून पळालेले राष्ट्रपती अशरफ गनी कॅशने (Ashraf Ghani) भरलेल्या चार कार आणि एका हेलिकॉप्टरसह काबुलमधून बाहेर पडले. न्यूज एजन्सी रॉयटर्सने आपल्या एका रिपोर्टमध्ये हा दावा केला आहे. रशियन न्यूज एजन्सी RIA आणि काही प्रत्यक्षदर्शींच्या संदर्भाने एजन्सीने म्हटले आहे की, अशरफ गनी यांना काही पैसे येथेच सोडून जावे लागले कारण ते इतके पैसे सोबत घेऊ शकत नव्हते.

काबुलमधील रशियन दूतावासाचे प्रवक्ते निकिता इंशचेन्को यांनी म्हटले, चार कार कॅशने भरल्या होत्या. यानंतर त्यांनी काही रक्कम हेलिकॉप्टरमध्ये ठेवली. यानंतर सुद्धा ते संपूर्ण पैसे घेऊन जाऊ शकले नाही, यामुळे काही पैसे इथेच सोडून गेले. रशियन दूतावासाच्या प्रवक्त्याने म्हटले की एका प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार हे सांगत आहे.

सध्या अशरफ गनी कुठे आहेत, हे कुणालाही माहित नाही. मात्र, रिपोर्टमध्ये हा दावा केला जात आहे की,
ते ओमानमध्ये पोहचले आहेत आणि त्यांना ताजिकिस्तान आणि कजाकिस्तानने आपल्या देशात येण्यास परवानगी दिली नाही.
ते ओमानवरून अमेरिकेत जाण्याच्या तयारीत आहे, असे म्हटले जात आहे.

अफगाणिस्तानमधून निघण्यापूर्वी फेसबुकवर लिहिलेल्या एका मोठ्या पोस्टमध्ये अशरफ गनी यांनी म्हटले होते.
की, ते देशात होणारा रक्तपात रोखण्यासाठी असे करत आहेत.
गनी यांनी म्हटले होते की, जर ते इथे राहिले तर त्यांचे समर्थक सुद्धा रस्त्यावर येतील आणि तालिबानच्या हिंसक वृत्तीमुळे आणखी रक्तपात होईल.

तालिबानने रविवारी काबुलमध्ये प्रवेश केला होता.
यासोबतच तालिबानने अफगाणिस्तानच्या जवळपास सर्वच क्षेत्रावर कब्जा केला आहे.
अमेरिका आणि नाटो सेना परतल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानमध्ये दशहत माजवली.
कंधार, गजनीसह अनेक मोठ्या शहरांवर कब्जा मिळवत तालिबान काबुलमध्ये पोहचला आहे.

अवघ्या 22 दिवसातच तालिबानने काबुलवर कब्जा मिळवला.
यामुळे अमेरिकन संरक्षणात तयार 3 लाख सैनिकांच्या अफगाण लष्कराबाबत सुद्धा अनेक प्रश्न निर्माण होत आहेत, ज्यांनी एकापाठोपाठ एक तालिबानसमोर शस्त्र खाली ठेवली.

Web Title :- Ashraf Ghani | afghanistan president ashraf ghani fled with 4 cars and chopper full of cash says reuters report

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Afghanistan Crisis | तालिबानी शासकांच्या भितीने अफगाणी नागरिक देश सोडण्यासाठी अस्वस्थ, पहा हृदयात धडकी भरवणारा व्हिडीओ

Maharashtra Unlock | राज्यातील शॉपिंग मॉल्स रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी, सुधारित शासन निर्णय जारी

Anil Deshmukh | अनिल देशमुखांना मोठ्ठा धक्का ! सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली