अफगाणिस्तानमध्ये नवं ‘संकट’ ? एकाच वेळी 2 जणांनी घेतली राष्ट्रपती पदाची ‘शपथ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी सोमवारी दुसऱ्या कार्यकाळासाठी पुन्हा एकदा राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. अशरफ गनी यांचे मुख्य प्रतिस्पर्धी अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी गनी यांच्या शपथेला अवैध ठरवतं त्याचवेळी एका दुसऱ्या समारोहात राष्ट्रपती पदाची शपथ घेतली.

अफगाणिस्तानच्या स्थानिक माध्यमानुसार अशरफ गनी यांच्या शपथ विधीला अमेरिकेचे विशेष राजदूत जालमय खालिजाद आणि अमेरिकी नाटो सैन्याचे कमांडर जनरल स्कॉट आणि इतर आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी उपस्थित होते. वृत्तानुसार अशरफ गनी यांच्या शपथविधी समारोहादरम्यान रॉकेट देखील डागण्यात आले. जेव्हा गनी भाषण करत होते त्या दरम्यान 2 ते 5 रॉकेट डागण्यात आले.

राष्ट्रपती पदाचे उमेदवार आणि अशरफ गनी यांचे विरोधक अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी गनी जेव्हा शपथ घेत होते त्याच वेळी एका वेगळ्या समारोहात त्यांनी देखील राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. असे सांगण्यात येत आहे की दोन्ही अफगाणी पक्ष आणि अमेरिकी राजदूत खालिजाद यांच्यामध्ये करारावर चर्चा होऊ शकली नाही.

तर तालिबानचे प्रवक्ता सुहैल शहीन यांनी अलजजीरा या वृत्तवाहिनीला सांगितले की दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्ष देशाच्या शांततेच्या प्रयत्नासाठी चांगले संकेत नाहीत. मागील महिन्यात अफगाणिस्तानच्या निवडणूक आयोगाने गनी यांना विजयी घोषित केले होते परंतु अब्दुल्ला अब्दुल्ला हे विजयावर अडून राहिले आणि तेच सरकार तयार करणार असे म्हणत अडून बसले. गनी आणि अब्दुल्ला यांनी आपला शपथविधी थांबवला होता परंतु अखेर गनी यांनी पुढाकार घेऊन शपथ घेण्याचा निर्णय घेतला.

अफगाणिस्तानात नवे संकट –
अफगाणिस्तानात राजकीय संकट आल्याने अनेक पक्षांमध्ये मिळून मंगळवारी जी बैठक होणार होती ती रद्द होऊ शकते. अफगाणिस्तान सुरु असलेल्या गृह युद्धाचा अंत करण्यासाठी तालिबान आणि अमेरिका यांच्यात शांतता करार झाला आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून आता अफगाण सरकार आणि अन्य पक्षात चर्चा होणार होती.

विश्लेषकांच्या मते अमेरिकेच्या अनेक प्रयत्नानंतर अशरफ गनी आणि अनेक विरोधी पक्षांमधील मतभेद दूर केले जाऊ शकत नाहीत, मग दोन्ही पक्ष करार करण्यात काही मुद्यांवर तयार असतीलही.

काबुलमधील नवा राजकीय संघर्ष अफगानिस्तानच्या कमकुवत लोकशाहीसाठी चांगले संकेत नाहीत कारण अमेरिका तालिबानसोबत झालेल्या करारानंतर अफगाणिस्तानमधील आपले सैन्य मागे घेण्याचा विचार करत आहे. दुसरीकडे राजकीय संकट अशा वेळी आले आहे जेव्हा अफगाणिस्तानचे सरकार तालिबानसोबत चर्चा करण्याची देखील तयारी करत आहे.

अमेरिकेचे राजदूत जालमय खालिजाद यांनी गनी आणि अब्दुल्ला यांच्यात रविवारी एक बैठक घडवून आणली, जेणे करुन त्यांना शपथ ग्रहण समारोह रद्द करण्यासाठी सांगता येईल. 2014 साली अफगाणिस्तानमध्ये निवडणूक झाली होती. अफगाणिस्तानच्या निवडणूक आयोगाकडून निकाल समोर आल्यानंतर 30 दिवसांच्या आत राष्ट्रपतींचा शपथ ग्रहण सोहळा होणे अनिवार्य आहे.