Aashram : बॉबी देओलसोबत इंटिमेट सीन देताना रडली होती त्रिधा चौधरी !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार बॉबी देओल (Bobby Deol) स्टारर आश्रम (Aashram) या वेब सीरिजचा पहिला सीजन प्रचंड गाजला. यानंतर याचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पहिल्या सीनजमध्ये यातील काही पात्रांनी खूप लक्ष वेधलं होत. यातील एक पात्र आहे ते म्हणजे बबिता. डायरेक्टर प्रकाश झा (Prakash Jha) यांनी डायरेक्ट केलेली ही सीरिज एम एक्स प्लेअरवर रिलीज झाली होती.

बबिता ही भूमिका त्रिधा चौधरी (Tridha Choudhury) हिनं साकारली आहे. त्रिधा आणि बॉबी देओल म्हणजेच सीरिजमधील बाबा यांच्यात पहिल्या सीझनमध्येही बोल्ड सीन्स दाखवण्यात आले होते. त्रिधानं आपल्या लुकनं आणि हॉट सीन्समुळं अटेंशन घेतलं आहे. दुसऱ्या सीझनचा ट्रेलर आल्यानंतर पुन्हा तिच्या हॉट सीन्सची चर्चा सुरू झाली होती. यातही बॉबी आणि त्रिधा यांचे इंटिमेट सीन्स पाहायला मिळाले होते. बोल्ड सीन्सबाबत त्रिधानं एका मुलाखतीत काही खुलासे केले आहेत. बॉबी सोबत इंटिमेट सीन देताना ती रडली होती, असं तिनं सांगितलं आहे.

एका मुलाखतीत बोलताना त्रिधानं सांगितलं की, बॉबी देओल सोबत इंटिमेट सीन्स करताना ती खूप घाबरलेली होती. त्रिधानं सांगितलं की, जोपर्यंत ती बॉबीला भेटली नव्हती तोपर्यंत ती खूप घाबरली होती. तिला खूप नर्व्हस वाटत होतं. परंतु जेव्हा तिनं बेड सीन शूट केले तेव्हा ती सामान्य झाली होती.

त्रिधाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतीच ती आश्रम वेब सीरिजच्या दोन्ही सीरिजमध्ये दिसली आहे.

https://www.instagram.com/p/B6cOSGBhLkm/

https://www.instagram.com/p/B6IQyBaBcY8/

https://www.instagram.com/p/B0VTOPfhdky/