मेट्रो – 3 च्या संचालक अश्विनी भिडे यांना प्रधान सचिवपदी बढती

मुंबई, पोलीसनामा ऑनलाइन – अश्निनी भिडे यांची प्रधान सचिव पदी बढती झालेली आहे. त्यामुळे मेट्रो 3 च्या संचालक पदी आश्विनी भिडे कायम राहणार आहेत. महाविकासआघाडीचे नवे सरकार स्थापन झाल्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्याचे सत्र सुरु झाले होते. त्यामुळे चर्चा होती की मेट्रो-3 च्या संचालक पदी असलेल्या अश्विनी भिडे यांची देखील बदली होणार. परंतु असे न होता उलट अश्विनी भिडे यांना त्यांच्या कामाची ही पोच पावतीच मिळाली असे म्हणावे लागेल.

मेट्रो कारशेड प्रकरणी अधिकारी असलेल्या आश्विनी भिडे यांना विरोधकांकडून घेरण्यात आले होते. शिवसेनेने देखील त्यांच्यावर टीका केली होती, आदित्य ठाकरे यांनी देखील अश्विनी भिडेंवर निशाणा साधला होता. परंतु भाजप सरकारच्या काळात पदावर नियुक्त झालेल्या अश्विनी भिडे मात्र त्यांच्या पदावर कायम राहिल्या असून उलट त्यांना बढती मिळाली आहे.

अश्विनी भिडे यांची प्रधान सचिव पदी पदोन्नती मिळाल्याने आता तेच मेट्रो – 3 च्या संचालक पदी कायम राहतील. उद्या त्या पदभार स्वीकारतील. त्यामुळे आता अश्विनी भिडे यांच्याच नेतृत्वात मेट्रो – 3 चे काम सुरु राहिलं.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/