लॉकडाउनमध्ये घरात बसून अश्विनी अय्यर तिवारी लिहितेय नारायणमूर्तीवर सिनेमा

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन  –  लॉकडाउनमध्ये प्रत्येकजण वेगवेगळ्या गोष्टी करत आहे. आपल्या आवडत्या सेलिब्रिटी काय करत असतील याची सगळ्यांनाच उत्सुकता असते. प्रसिद्ध दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी काय करते आहे माहिती आहे? इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायणमूर्ती आणि त्यांच्या पत्नी आयटी तज्ज्ञ सुधा मूर्ती यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची पटकथा लिहिण्याचं काम अश्विनी करत आहे.

फेसबूकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार होऊ शकतात तर नारायणमूर्तींच्या आयुष्यावर चित्रपट तयार होणंही तितकंच गरजेचं आहे असं अश्विनीचं मत आहे. त्यामुळेच तिनी पटकथा लिहायला सुरूवात केली आहे. आपण वाट पहायची ती हा चित्रपट आपल्या भेटीला कधी येतो त्याची…