Lockdown मध्ये पोलीस उपनिरीक्षकानं केलं लग्न अन् होम क्वारंटाईनमध्ये झाडली स्वत:वर गोळी

पोलिसनामा ऑनलाईन, दि. 11 ऑगस्ट : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लावलेल्या लॉकडाऊनमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने लग्न केलं आणि होम क्वारंटाईनमध्ये त्याने स्वत:वर गोळी झाडल्याची घटना झारखंड राज्यातील जमशेदपूरमध्ये घडली आहे. या घटनेमुळे गोलमुरी पोलिस लाईन परिसरात खळबळ माजली आहे.

तरुण पांडे असे मयत पोलिसाचे नाव असून तो सहायक उपनिरीक्षक पदावर कार्यरत होता.

याबाबत मिळालेली माहिती अशी, तरूण पांडे याला राष्ट्रीय स्तरावरील हँडबॉल खेळाडूला क्रीडा कोट्यातून पोलिस खात्यात नोकरी मिळाली होती. तसेच त्याला पदोन्नती देखील मिळाल्याने तो सहाय्यक उपनिरीक्षक बनला होता. अगदी दोन महिन्यांपूर्वी त्याने लॉकडाऊनमध्ये लग्न केले होते. लग्न झाल्यापासून तो होम क्वारंटाईनमध्ये गोलमुरी पोलिस लाईन परिसरात होता. मात्र, याच दरम्यान जेव्हा पत्नीशी कडाक्याचा वाद झाला, तेव्हा त्याने एका खासगी रिव्हॉल्व्हरने स्वत:वर गोळी झाडली.

सहायक उपनिरीक्षक तरुण पांडे हा पत्नीसमवेत गोलमुरी पोलिस लाईनवरील तिसर्‍या मजल्यावरील प्लॅटमध्ये राहत होता. घटना घडल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

तरूण पांडेला पदोन्नती मिळाली होती. त्यानंतर ड्युटी करत होता परंतु काही दिवसांपासून कोरोनाचा फैलाव वाढल्याने तो होम क्वारन्टाईनमध्ये राहत होता.

सहायक उपनिरीक्षकने तरुणने जून महिन्यात लग्न केले होते. तरुण पांडे हा एक उत्तम खेळाडू असल्याने त्याची निवड क्रीडा कोट्यातून पोलीस विभागात झाली होती.

सोमवारी दुपारी तरुण पांडे आणि त्याच्या पत्नीमध्ये कोणत्यातरी गोष्टीवरून कडाक्याचा वाद झाला. हा वाद वाढल्यानंतर त्याने एका खासगी रिव्हॉल्व्हरने स्वत: ला गोळी झाडली.

गोळीचा आवाज ऐकून त्यांच्या (तरुण पांडेच्या) पत्नीने आरडाओरडा केला, पत्नीचा आवाज ऐकून शेजारील लोक मदतीसाठी धावले. तेव्हा त्यांना तरुण पांडे रक्तांच्या थारोळ्यात पडला होता. शेजारच्यानी त्याला रुग्णालयात नेले मात्र, डॉक्टरांनी तरुणला मृत घोषित केले. कारण, सहायक उपनिरीक्षक तरुण पांडेने त्याच्या स्वत: च्या डोक्यावर रिव्हॉल्व्हरने गोळी झाडल्यामुळे त्याचा जीव वाचवणे शक्य नव्हते.

सहायक उपनिरीक्षक तरुण पांडे हा एएसआय नालंदा बिहार शरीफ येथील रहिवासी आहे, असे सांगितले जात आहे. त्याच्याकडे असलेल्या रिव्हॉल्व्हरचा नालंदा इथला परवाना होता. पोलीस या घटनेचा अधिक तपास गोलमुरी पोलिसांनी सुरू केला आहे.

या घटनेची माहिती मिळल्यानंतर जमशेदपूरच्या एसएसपी आणि सिटी एसपी यांच्यासह सर्व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. याबाबत सहायक उपनिरीक्षक तरुण पांडे याच्या पत्नीची चौकशी करत आहेत.

या घटनेबाबत एसएसपीने सांगितले आहे की, झारखंड पोलीस क्रीडा कोट्यातून तरुण पांडे भरती झाला होता. याअगोदर तो बीएसएफमध्ये तैनात होता. त्यांचा स्वभाव प्रेमळ होता. तसेच त्याचा विवाह मागच्या जूनच्या महिन्यात झाला होता. लग्नानंतर परतल्यानंतर तो होम क्वारंटाईनमध्ये राहत होता. सहायक उपनिरीक्षक तरुण पांडे याने एवढे टोकाचे पाऊल का उचलले? शोध पोलिस घेत आहेत.