ASI Pandurang Laxman Wanjle | पांडुरंग वांजळे यांचा कोथरूड राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे सत्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अखंड पोलिस सेवा करत महाराष्ट्राची मान अभिमानाने उंच करणारे मराठी मातीतील सुपुत्र सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (क्राईम ब्रँच पुणे शहर) पांडुरंग वांजळे (ASI Pandurang Laxman Wanjle) यांना भारत सरकारतर्फे मानाचे राष्ट्रपती पदक देऊन गौरविण्यात आले आहे. आज त्याच निमित्ताने राष्ट्रवादी युवक काँग्रेस (NCP) पुणे शहराचे सरचिटणीस गिरीश गुरनानी (Girish Gurnani ) यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. (ASI Pandurang Laxman Wanjle)

 

त्यांच्या कार्याची ओळख असलेले सर्व हितचिंतक या निमित्ताने त्यांचे अभिनंदन करण्यास उत्सुक होते. पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने सरचिटणीस गिरीश गुरनानी यांनीही वांजळे यांचे अभिनंदन व सत्कार केला. या वेळी माध्यमांशी बोलताना गुरनानी म्हणाले “वांजळे हे एक कर्तव्यदक्ष व प्रामाणिक पोलीस अधिकारी आहेत. त्यांच्या अविरत कार्याचा गौरव आज प्रशासनाने व महामहीम राष्ट्रपतींनी केला याबद्दल त्यांचें हार्दिक अभिनंदन व प्रशासनाचे आभार. ही वांजळे बरोबरच कोथरूड साठीही अभिमानाची बाब आहे.” “अश्या प्रामाणिक अधिकाऱ्यांना जनतेच्या वतीने अधिकाधिक सहयोग होत रहावा जेणे करून त्यांच्या दैनंदिन पोलीस कार्यात आणखीन भर पडेल याची दक्षता सर्व स्थरातील नागरिकांनी घेणे गरजेचे आहे.” असे ही गुरनानी यावेळी म्हणाले. (ASI Pandurang Laxman Wanjle)

 

ही त्यांच्या निरंतर राष्ट्रभक्ती आणि देशसेवेची फलश्रुती असून याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन ! येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी ते आदर्श असतील, असा यावेळी विश्वास वाटतो असे सरचिटणीस गुरनानी म्हणाले. यावेळी धनंजय शेळके, संदेश कोतकर, सौरभ ससाणे, निलेश बच्चेवार, सचिन भवाळकर उपस्थित होते.

 

Web Title :- ASI Pandurang Laxman Wanjle | Pandurang Wanjle felicitated by Kothrud Nationalist Youth Congress

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा