Coronavirus : चीनकडून मनुष्यावर ‘कोरोना’च्या लसीला ‘टेस्ट’ करण्याची परवानगी, अमेरिकेनं यापुर्वीच घेतलं ‘ट्रायल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात 7000 पेक्षा जास्त लोकांचा जीव घेतलेल्या प्राणघातक कोरोना विषाणूवर लवकर नियंत्रण मिळण्याची शक्यता आहे. अमेरिकेनंतर चीननेही आपल्या वैज्ञानिकांना मानवावर कोरोना विषाणूच्या लसीची चाचणी घेण्यास मान्यता दिली आहे. दरम्यान, काल अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी चार अमेरिकन स्वयंसेवकांवर कोरोना विषाणूच्या लसीच्या चाचणीविषयीही माहिती दिली. मात्र, या लसीवरून जर्मनी आणि अमेरिकेत वाद आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चीनमध्ये कोरोना विषाणूला रोखण्यासाठीचे काम बर्‍याच दिवसांपासून सुरू आहे. आता हे संशोधन अंतिम टप्प्यावर आहे. शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या या लसीची चाचणी आता सामान्य लोकांवर केली जाणार आहे, यासाठी सरकारने संमती दिली आहे. दरम्यान, चीनमधून पसरलेला कोरोना व्हायरसने सुमारे 150 देशांना ग्रासले होते. जगभरात 7000 हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत, त्यापैकी निम्मे एकट्या चीनमधील आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, लसीची चाचणी सुरू झाली आहे असून त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. अहवालानुसार आता मानवांवर त्याची चाचणीही सुरू होत आहे. राष्ट्रीय आरोग्य चाचणी संस्था यासाठी वित्तपुरवठा करीत आहे. या लसीविषयी माहिती देताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “हे सांगताना फार आनंद होत आहे कि, लस चाचणीचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. इतिहासात प्रथमच, लस इतक्या वेगवान बनविण्यात आली आहे. आम्ही अँटी-व्हायरल थेरपी आणि इतर उपचार देखील विकसित करीत आहोत.