पाकिस्तान सोबतचे आमचे संबंध डोंगरासारखे मजबूत बनलेत, चीननं सांगितलं

 बिजिंग : वृत्तसंस्था – चीनने गुरुवारी म्हटले की, बदललेल्या अंतरराष्ट्रीय स्थितीतही त्यांचे पाकिस्तानशी संबंध डोंगरासारखे मजबूत आहेत. दोन्ही शेजारी देशांच्या संबंधांच्या स्थापनेला 69 वर्ष पूर्ण झाले आहेत. पाकिस्तानने 1951 मध्ये चीनला मान्यता दिली होती. भारताने त्यापूर्वीच चीनला मान्यता दिली होती. भारत आशियातील पहिला कम्युनिस्ट नसलेला देश होता, ज्याने 1950 मध्ये चीनसोबत संबंध प्रस्थापित केले. इस्लामी गणराज्य पाकिस्तानचे संबंध उशीरा स्थापन झाले असले तरी नंतर तो कम्युनिस्ट चीनचा अत्यंत जवळचा सहकारी बनला.

मागील वर्षात 60 अरब अमेरिकन डॉलरसह चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरसह दोन्ही देशांनी संबंध अधिक घट्ट केले आहेत. ही चीनने परदेशात केलेली सर्वात मोठी गुंतवणूक आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ यांनी म्हटले की, आज चीन आणि पाकिस्तानच्या संबंधांचा 69 वा वर्धापनदिन आहे. मी शुभेच्छा देतो. आमच्यात सहयोगात्मक रणनीतिक भागीदारी आहे. मागील 69 वर्षात बदललेल्या अंतरराष्ट्रीय स्थितीत सुद्धा हे संबंध कायम राहीले आणि डोंगरासारखे मजबूत बनले आहेत. झाओ हे पूर्वी इस्लामाबादमध्ये चीनचे उपराजदूत होते.

ते म्हणाले, मला पाकिस्तानात काम करण्याची संधी मिळाली. देश सोडण्यापूर्वी, मी म्हटले होते की, पाकिस्तानने माझे हृदय चोरले आहे. मला वाटते यातून दोन्ही देशातील मित्रता दिसून येते. भविष्यात आपले द्विपक्षीय संबंध आणखी वाढतील असा पूर्ण विश्वास आहे. आम्ही शेजारी धोरणात पाकिस्तानला प्राधान्य देत राहू. उच्च गुणवत्तेच्या सीपीईसी विकासासाठी एकत्र काम करत राहू. भारताने सीपीईसीबाबात चीनला विरोध दर्शवला होतो, कारण तो पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमधून जातो.