Asia Cup 2023 Final | आशिया चषकावर भारताचे सि’राज’! श्रीलंकेचा दहा विकेटने पराभव करत आशिया चषकावर कोरले नाव

कोलंबो : वृत्तसंस्था – Asia Cup 2023 Final | मोहम्मद सिराजच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने आशिया चषकावर आपले नाव कोरले आहे. कोलंबो येथे झालेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात मोहम्मद सिराज याने भेदक गोलंदाजी केल्याने श्रीलंकेचा संघ 50 धावांत गारद झाला. श्रीलंकेने ठेवलेले माफक आव्हान भारताने एकही विकेट न गमावता पार केले. भारताकडून सलामीला आलेल्या शुभमन गिल आणि इशान किशन या जोडीने अवघ्या 6.1 षटकात सामना भारताच्या नावावर केला. (Asia Cup 2023 Final)

भारताकडून इशान किशन आणि शुभमन गिलच्या वेगवान फलंदाजीने श्रीलंकेच्या गोलंदाजांना खेळण्याची संधी दिली नाही. रोहित शर्मा सलामासाठी न उतरता त्याने इशान आणि गिलची जोडी मैदानात पाठवली. कर्णधाराने दाखवलेला विश्वास या जोडीने सार्थ ठरवत अवघ्या 6 षटकात विजयाचे लक्ष पार कले. शुभमन गिल याने 19 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने नाबाद 27 धावा केल्या. तर ईशान किशन याने 18 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 23 धावांची खेळी केली. (Asia Cup 2023 Final)

सिराजचा विकेटचा षटकार

कोलंबो मध्ये झालेल्या आशिया चषक 2023 च्या अंतिम सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. सिराज आणि हार्दिकच्या माऱ्यापुढे श्रीलंकेचा एकही खेळाडू टिकू शकला नाही. श्रीलंकेचा संपूर्ण संघ 50 धावांत आटोपला. मोहम्मद सिराज याने 7 षटकांमध्ये 21 धावा देऊन 6 विकेट घेतल्या. तर हार्दिक पांड्याने 2.2 षटकांमध्ये 3 धावा देऊन 3 विकेट घेतल्या. सिराजच्या माऱ्यामुळे आशियातील सर्वात मोठ्या स्पर्धेच्या अंतिम सामना एकतर्फी झाल्याचे पाहायला मिळाले. (IND Vs SL)

आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाच्या गोलंदाजांसमोर श्रीलंकेचा संघ गडबडला.
जसप्रीत बुमराह याने पहिल्याच षटकात विकेट घेत लंकेला धक्का दिला.
यानंतर मोहम्मद सिराजने चौथ्या षटकात चार विकेट घेत लंकेचे कंबरडे मोडले.
त्यानंतर सिराजने मेंडिस आणि शनाका यांच्या क्लीन बोल्ड विकेट घेत श्रीलंकेचे मोठ्या धावसंख्येचे स्वप्न धुळीस मिळवले.
त्यानंतर हार्दिक पांड्याने 3 विकेट्स घेत लंकेला 50 धावांवर ऑल आऊट केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sadabhau Khot | ‘राष्ट्रवादीचे वळू बैल शेतकऱ्यांच्या बांधावर सोडू नका अन्यथा…’ – सदाभाऊ खोत

Total
0
Shares
Related Posts
Maharashtra Assembly Election 2024 | sanjeevraje naik nimbalkar and deepak chavan join sharad pawar group ramraje nimbalkar not campaign for mahayuti

Maharashtra Assembly Election 2024 | फलटणच्या राजकारणात मोठ्या घडामोडी ! संजीवराजेंसह आमदार दीपक चव्हाण शरद पवार गटात प्रवेश करणार; रामराजेंचा मात्र वेगळा निर्णय; म्हणाले – ‘भाजपच्या विचारसरणीशी भांडण नाही पण …’