आशिया चषक : पारंपरिक प्रतिस्पर्धी आज आमनेसामने 

दुबई : पोलीसनामा ऑनलाईन

भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी आज आशिया चषक स्पर्धेत एकमेकांसमोर आमनेसामने भिडणार आहेत . भारतातील आणि पाकिस्तानातील देखील क्रिकेट चाहते ज्या दिवासाची प्रतिक्षा करत होते तो दिवस उजाडला आहे. तब्ब्ल सव्वा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर  महामुकाबला रंगणार आहे . या सामन्याची क्रिकेट वर्तुळात बऱ्याच दिवसापासून चर्चा सुरूआहे.आशिया चषकाच्या प्राथमिक साखळीतला भारत-पाकिस्तान सामना आज दुबईत खेळवण्यात येईल. या स्पर्धेच्या निमित्तानं दोन्ही संघ नऊ दिवसांत तीनवेळा एकमेकांविरुद्ध खेळण्याची शक्यता आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9bd197eb-bbe1-11e8-a108-0f07be5d184e’]

केवळ सामान्य क्रिकेट चाहतेच नव्हे तर सेलेब्रिटीनांही या सामन्याची उत्सुकता आहे. म्हणूनच की काय पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान हे या सामन्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आशिया कप स्पर्धेच्या स्वारीवर आलेला हिंदुस्थानचा संघ नक्कीच बलाढय़ आहे, मात्र पाकिस्तानी संघही सध्या  जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.हिंदुस्थानने सर्वाधिक सहा वेळा आशिया कप जिंकलेला असून पाकिस्ताननेही दोन वेळा या करंडकावर नाव कोरलेले आहे.

[amazon_link asins=’B073Z334RT,B07518R5HH,B016F79C78′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8ea86be9-bbe4-11e8-ab2a-a5214cd33fb6′]

१९ सप्टेंबर २०१८ हा दिवस भारतासाठी इंग्लंडच्या ओव्हलवर झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची संधी घेवून आला आहे तर आशिया कपच्या आकडेवारीत किंचीत मागे पडलेला पाक भारताचा पराभव करुन आकडेवारीत बरोबरी साधण्यासाठी प्रयत्न करेल. ताणलेल्या राजकीय संबंधांमुळे उभय देशांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून  द्विपक्षीय मालिका होऊ शकली नाही.