चीनमध्ये ‘कोरोना’ व्हायरसनंतर आता नवे संकट, धोक्याच्या पातळीच्यावर वाहतायेत तब्बल 148 नद्या

बिजिंग : जगाला कोरोना महामारी देणार्‍या चीनच्या अडचणींचा काळ अजून संपलेला नाही. आता चीनमध्ये नवीन संकट धडकत आहे. या संकटाचे नाव आहे, पूर. चीनमध्ये पूराचा धोका वाढला आहे. एवढेच नव्हे, चीनच्या काही भागात सध्या पूर परिस्थिती आहे. तेथील जवळपास दिडशे नद्या धोक्याच्या पातळीच्या वरून वाहत आहेत.

चीनचे मीडिया हाऊस ग्लोबल टाइम्सनुसार, अधिकार्‍यांनी घोषणा केली आहे की,  चीनने पूराच्या स्थितीत प्रवेश केला आहे. येथे 148 नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत आणि काही प्रदेशात पूर सुद्धा येत आहे. ग्लोबल टाइम्सने अधिकार्‍यांचा संदर्भ देत म्हटले की, गुरूवारी सकाळी ही माहिती देण्यात आली आहे.