Coronavirus : ‘लॉकडाऊन’ संपल्यानंतर वुहान शहरात थांबलेल्या भारतीयांनी सांगितला ‘कोरोना’शी लढण्याचा ‘एकमेव’ मार्ग, जाणून घ्या

बीजींग/वुहान : चीनच्या वुहान शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 11 आठवडे लागले. यादरम्यान वुहानमध्ये लॉकडाऊन करण्यात आला होता. आता वुहानमधील लॉकडाऊन हटवल्याने या ठिकाणच्या नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. वुहानमध्ये अकडलेल्या भारतीयांनी देशातील नागरिकांना एक संदेश दिला आहे. कोरोना विषाणूपासून आपला बचाव करायचा असेल तर सामाजिक अंतर हाच या रोगावरील प्रभावी उपाय आहे. तसेच खूप दिवस चाललेला लॉकडाऊन बुधवारी हटवल्याने आम्ही आनंदी आहोत.

वुहानमध्ये हायड्रोबायोलॉजिस्ट म्हणून काम करणारे अरुणजीत टी सार्थजीत यांनी आपला अनुभव सांगताना म्हणाले, मी मझ्या खोलीत 73 दिवसांपेक्षा जास्त दिवस राहिलो. मी फक्त परवानगी घेऊन माझ्या लॅबमध्ये जात होतो. आज मी व्यवस्थित बोलू शकत नाही कारण लॉकडाऊनच्या काळात मी जास्त बोलत नव्हतो. कारण बोलण्यासाठी कोणीच नव्हते, सर्वजण आपआपल्या घरात होते.

एअर इंडियाने 700 जणांना मायदेशात आणले
एअर इंडियाच्या दोन विशेष विमानाद्वारे भारताने सुमारे 700 भारतीय व परदेशी नागरिकांना चीनमधून बाहेर काढले. पण केरळ मधील अरुणजीत यांनी याठिकाणी राहण्याचे ठरवले आणि अशा कठीण परिस्थितीतून पळून जाणे हे भारतीयांना चांगले वाटले नसते. म्हणून परिस्थितीला धैर्याने सामोरे जायचे त्यांनी ठरवले. चीनच्या हुबेई प्रांतात कोरोनाची 67 हजार 803 जणांना लागण झाली आहे. त्यापैकी 50 हजार 8 प्रकरणे राजधानी वुहानमधील आहेत.

भारतासाठी लॉकडाऊन महत्त्वाचे
अरुणजीत हे असे भारतीय आहेत ज्यांनी एक कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या आणि कोरोनाचे केंद्रबिंदू असलेल्या वुहानमधून भारतात न परतण्याचा निर्णय घेतला. अरुणजीत हे मायक्रोबायोलॉजिस्ट ते हाईड्रोबायोलॉजिस्ट झाले असून ते वुहानमध्ये संशोधक म्हणून कार्यरत आहेत. ते म्हणाले की, भारताने लॉकडाऊन करून चांगले केले. परंतु मान्सूनच्या काळात देशात मोठी समस्या उद्भवू शकते कारण त्या काळात लोकांची प्रतिकार शक्ती कमी होते.

वुहानवरून धडा घ्यावा
अरुणजीत म्हणाले की, कोरोना व्हायरस प्राणघातक ठरू शकतो. वुहानकडून धडा घेतला जाऊ शकतो तो म्हणजे लॉकडाऊन आणि सामाजिक अंतर ठवणे. व्यावसायाने आणि वुहानमध्ये राहणारे आणखी एका भारतीय वैज्ञानिकाने अरुणजीत यांच्या मताचे समर्थन केले आहे. ते देखील या ठिकाणी वास्तव्यास आहेत.
नाव न सांगण्याच्या अटीवर ते म्हणाले, मी 72 दिवस स्वत:ला माझ्या घरात कैद करून घेतले होते. माझ्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबाला तीन लहान मुले आहे. मी त्यांना एकदाही घरातून बाहेर पडलेले पाहिले नाही. त्यांनी देखील भारतीयांना लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. मी जिवंत राहिलो याचा मला आनंद झाला. मात्र तरीही मी बाहेर जाण्याचे टाळत आहे. कारण संसर्ग झालेल्या एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात येण्याची मला भीती आहे. त्यांनी वुहानमध्ये राहण्याचे निर्णय घेऊन भारतीय दूतावासाची ऑफर नाकारली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like