न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा लग्नबंधनात, आधी बाळ नंतर लग्न, अशी आहे प्रेमकहाणी

वेलिंग्टन : पोलिसनामा ऑनलाईन – आपल्याकडे भारतीय संस्कृतीनुसार पहिले लग्न मग बाळ असा विचार केला जातो. लग्नाआधी बाळ झाले तर आपल्याकडे त्यामुलीला खुप वाईट वागणूक दिली जाते. पण नूझीलंडमध्ये एक अनोखा प्रकार घडला आहे. चक्क न्यूझिलंडची पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न आणि एका टिव्ही चॅनेलमध्ये काम करणारे क्लार्क गेफोर्ड लग्नाच्या आधी मुलगी झाली आणि मग त्यांनी लग्न केले. यांची अनोखी प्रेमकहाणी सविस्तर जाणून घेऊया.

गेल्या वर्षी मशिदीत झालेल्या बॉम्ब स्फोटानंतर जेसिंडा खुप चर्चेत आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी देशाला उद्देशून केलेले सडेतोड भाषण चांगलेच गाजले होते. त्यानंतर त्यांच्या लग्नाविषयी चर्चा खुप रंगल्या त्यांची कहाणी अशी की, क्लार्क ने ५ वर्षापुर्वी त्यांना आपल्या मतदार संघातील एका समस्येबाबत तक्रार केली होती. या तक्रारीचे निवारण करायला बराच काळ लागला यामध्ये जेसिंडा व क्लार्क यांचे वारंवार भेटणे, बोलणे होऊ लागले. ते नेहमी एकमेकांच्या संपर्कात येऊ लागले. यांच्यामध्ये पहिली मैत्री मग प्रेम झाले. त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली. त्यांचे प्रेम प्रदिर्घ काळ टिकले.

गेल्या वर्षी यांना मुलगी झाली. त्यावेळी त्यांचे लग्न झाले नव्हते. लग्नापुर्वी मुलगी झाल्याने यांची चर्चा बरीच रंगली. मुलगी झाल्यानंतर त्यांनी बरीच मोठी सुट्टी घेतली. आणि आता ते मुलीचा छान प्रकारे सांभाळ करीत आहे. त्या जगातील दुसऱ्या अशा पंतप्रधान महिला आहे. आता दोघांनीही लग्नाची गाठ बांधली आहे. लग्नाआधी मुलगी झाल्याची चर्चा प्रचंड प्रसिद्ध होत आहे. बाळासोबत काढलेला हा फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like