नेमबाजांकडून पदकांची लयलूट

जकार्ता : 

भारतीय शूटरनी आशियाई स्पर्धेचा तिसरा दिवास गाजवला. पहिल्यांदा सौरभ चौधरीने १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्ण आणि अभिषेक वर्माने कास्य पदक पटकावले. त्यांच्या पाठोपाठ अनुभवी संजीव राजपूतने ५० मीटर थ्री पोजिशन रायफल प्रकारात रौप्य पदक जिंकले. यंदाच्या एशियाड खेळांमध्ये आतापर्यंत नेमबाजांनी भारताला मिळवून दिलेलं हे सहावं पदक ठरलं आहे.
[amazon_link asins=’B07FDXCWRH,B06Y93HZW1′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6baab875-a52a-11e8-b33e-1fc9b2ba45fa’]

५० मी. रायफल थ्री पोजीशन हा नेमबाजीतला सर्वात कठीण प्रकार मानला जातो. नेमबाजाला ३ प्रकारांमध्ये निशाणा साधायचा असत. एकाग्रचित्ताने खेळ करत पहिल्या दोन प्रकारांमध्ये आघाडी कायम राखली. अखेरच्या क्षणांमध्ये संजीव राजपूतने कमी गुणांची कमाई केल्यामुळे तो तिसऱ्या स्थानावर फेकला गेला. याचा फायदा घेत चीनी प्रतिस्पर्ध्याने पहिलं स्थान पटकावलं. मात्र संजीवने वेळेतच स्वतःला सावरत रौप्य पदकावर आपला हक्क सांगितला . संजीव राजपूत हे इंडियन नेव्हीत कार्यरत आहेत. त्यांनी काही दिवासापूर्वीच गोल्ड कोस्ट येथील राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले होते. याचबरोबर गेल्या आशियाई स्पर्धेत १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात कास्य पदक जिंकले होते. गेल्या आशियाई स्पर्धेत १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात कास्य पदक जिंकले होते.