अन् भारतीय बॉक्सरच्या ठोशाला घाबरून पाकिस्तानी महिला बॉक्सर मैदान सोडून पळाली 

जकार्ता :

भारत आणि पाकिस्तान खेळाच्या मैदानात आमने सामने आले की तेथील वातावरण तापते. इंडोनेशिया येथील जकार्ता येथे १८व्या आशियायी स्पर्धा सुरु आहेत. अशाच काहीशा घटनेची प्रचिती बॉक्सिंगच्या खेळादरम्यान आली.

स्क्वॅाशमध्ये भारताने खातं उघडलं

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत महिलांच्या ६० किलो वजनी गटाच्या उपउपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमने सामने होते. भारताची पवित्रा आणि पाकिस्तानची पर्वीन रुखसाना समोरासमोर आल्या. पण, भारतीय बॉक्सर्सच्या ठोशासमोर पाकिस्तानी खेळाडूचा निभाव लागला नाही.

पवित्राने पहिल्याच फेरीत जोरदार आक्रमण करून रुखसानाला रिंग सोडून पळ काढण्यास भाग पाडले. पंचांना मध्यस्थी करून पहिल्या फेरीतच सामना थांबवाव लागला आणि पवित्राला विजयी घोषित करावे लागले. पविश्राने तांत्रिक आघाडीच्या जोरावर हा सामना जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
[amazon_link asins=’B07G556924′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’58e4d64e-a867-11e8-b58c-cd3be2735eff’]