Asian Games 2018 : दुसऱ्यांदा रंगणार जकार्तामध्ये स्पर्धा..!

जकार्ता : वृत्तसंस्था

ऑलिम्पिकपाठोपाठ जगातली दुसऱ्या क्रमांकाची मोठी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा अशी एशियाडची ओळख आहे. आशियाई ऑलिम्पिक समितीच्या वतीनं एशियाडचं आयोजन करण्यात येणारी एशियाड स्पर्धा एशियाड म्हणजे आशियाई देशांसाठी सर्वोच्च क्रीडा मेळा. ऑलिंपिकच्या धर्तीवर दर चार वर्षांनी आशियाई देशांसाठी होणारा बहुविध खेळांचा महोत्सव म्हणजे एशियाड.

जकार्ता मध्ये दुसऱ्यांदा एशियाड स्पर्धेचा मान मिळालेला आहे. या आधी १९६२ साली जकार्ता मध्ये ही स्पर्धा घेण्यात अली होती. आता पुन्हा आज पासुन १८ व्या आशियाई स्पर्धेला सुरवात होणार आहे. १८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०१८ या कालावधीत ही सपर्धा पार पडणार आहे. एशियाड ही स्पर्धा जकार्ता आणि पालेमबर्ग या महत्वाच्या शहरांमध्ये होणार आहे. एशियाडच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन शहरांमध्ये खेळांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या यामध्ये ४५ देश, ३६ खेळ, ५७२ खेळाडू, आणि लक्ष एकच.. एशियाडचं पदक…! अठराव्या एशियाडमध्ये 58 क्रीडाप्रकारांत मिळून एकूण 465 पदकं पणाला लागलेली असतील, प्रत्येक खेळाडू आपले कौशल्य सिद्ध करून पदकाकडे वाटचाल करेल.
[amazon_link asins=’B077WY86ZT,B07CRGDR8L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5784f257-a2de-11e8-b4bc-ddc72758b071′]

एशियाडच्या स्पर्धेत भारताची कामगिरी
एशियाडच्या आजवरच्या इतिहासात भारतानं 616 पदकांची कमाई केलीअसून, त्यात 139 सुवर्ण, 178 रौप्य आणि 299 कांस्यपदकांचा समावेश आहे.

भारत आणि एशियाड
नुकतेच आपल्या देशाला स्वतंत्र मिळून चार वर्ष पूर्ण झाली होती. तेव्हा भारताने १९५१ मध्ये पहिल्या एशियाडचं आयोजन केले गेले. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंच्या प्रयत्नामुळे ते यशस्वी पार पडलं. पुढे आशियाई देशांमधील सलोखा वाढीस लागावा आणि या देशांमध्ये दृढतेची भावना निर्माण व्हावी हा त्यामागचा उद्देश होता. पुढे 1982 साली इंदिरा गांधी पंतप्रधान असताना नवी दिल्लीत दुसऱ्यांदा एशियाडचं आयोजन करण्यात आलं होतं. या यामध्ये भारताला पाचव्या स्थानावर 13 सुवर्णपदकांसह समाधान मानावे लागले. त्या एशियाडचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बोधचिन्ह अप्पू. आज ४५ ते ५० वयोगटातल्या भारतीयांच्या मनात तो अप्पू आजही घर करुन आहे.

हॉकीत गोल्ड कामगिरी ?

चॅम्पियन्स ट्रॉफीतभारतीय संघ उपविजेता वर समाधान मानावे लागले. या वेळी पुरुष हॉकी संघाने या स्पर्धेत गोल्ड पदकाचे स्वप्न पाहिलं आहे. जेणेकरून २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये संघाला थेट प्रवेश मिळवता येईल. मात्र असे न झाल्यास आशियाई स्पर्धेत भारतीय पुरुष संघ सुवर्णपदकाशिवाय परत आला, तर ही भारतासाठी सर्वांत धक्कादायक गोष्ट असेल.

ट्रॅक अँड फिल्ड
ट्रॅक अँड फिल्डमध्ये भारतीय अॅथलिटने आशियाई स्पर्धेत नेहमीच उत्तमी कामगिरी केली आहे. आशियाई स्पर्धेत आतापर्यंत भारताने ७४ सुवर्ण, ९६ रौप्य, ११२ ब्राँझ अशी एकूण २८२ पदकांची कमाई केली आहे.यंदा अॅथलेटिक्समध्ये भारताचे ५० खेळाडू सहभागी झाले आहेत. या वेळी भाला फेकपटू नीरज चोप्रा, धावपटू द्युती चंद, हिमा दास, खुशबिर कौर, सीमा पुनिया यांच्याकडून सुवर्णपदकाच्या आशा आहेत.

कुस्ती पणाला
मागील स्पर्धेत भारताने कुस्तीत १ सुवर्ण, १ रौप्य आणि ३ ब्राँझपदके मिळवून समाधानकारक कामगिरी आहे. मात्र या वेळी सुशीलकुमार, बजरंग पुनिया, विनेश फोगट, साक्षी मलिक यांच्याकडून पदकाच्या आशा बाळगल्या जात आहेत. कुस्तीत भारताने १२ पुरुष आणि ६ महिला मैदानात उतरणार बाजी मारणार का ?

नेमबाज साधणार सुवर्ण निशाणा
२०१४ मध्ये भारताने १ सुवर्ण, १ १ रौप्य,आणि सोबतच कांस्य पदकाची कमाई केली होती. मात्र या वेळी अधिक चांगल्या प्रकारे कामगिरी करतील अशी अपेक्षा आहे. नेमबाजीत भारताचे १६ पुरुष आणि १२ महिला सहभागी झाले आहेत. मनू भाकेरकडून सर्वाधिक अपेक्षा आहेत. हीना सिद्धू, राही सरनोबत, संजीव राजपूत, रवीकुमार असे उत्तम दर्जाचे नेमबाज सुवर्णलक्ष साधणार का ?

बॅडमिंटन ‘गोल्ड शटल’ ची इच्छा ?
मागील स्पर्धेत भारताला एकाच कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. या वेळी साईना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, किदाम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय यांना उत्तम कामगिरी करावी लागेल. भारताचे १० पुरुष आणि १० महिला बॅडमिंटनपटू स्पर्धेत सहभागी झाले आहेत. बॅडमिंटनमध्ये आशियाई खेळाडूंचे वर्चस्व आहे. सिंधू या स्पर्धेत तरी अंतिम फेरीचा अडथळा पार करेल का, याबाबत उत्सुकता आहे. चीन, थायलंड, जपानसारख्या संघांना नमविणे आव्हानही सांघिकमध्ये असेल.

इतर खेळांतही उत्तम कामगिरीची अशा
स्क्वॉश, टेनिस, तिरंदाजी या खेळातून भारताला सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. टेनिसमधील वादामुळे लिअँडर पेसने स्पर्धेतून माघार असून त्याच्याविना टेनिसपटूंना आपली कामगिरी चोख बजवावी लागणार आहे. जिम्नॅस्टिक्समध्ये दीपा कर्माकर, रोइंगमध्ये दत्तू भोकनळ, स्वर्णसिंग, वेटलिफ्टिंगमध्ये सतीशकुमार शिवलिंगम, अजय सिंग, विकास ठाकूर, टेबल टेनिसमध्ये अचंता शरथ कमल, साथियन, मनिका बात्रा, मौमा दास, स्क्वॉशमध्ये सौरभ घोषाल, हरिंदरपाल सिंधू, जोश्ना चिनप्पा, दीपिका पल्लीकल, तर तिरंदाजीत अतनू दास, अभिषेक वर्मा, दीपिका कुमारी, लक्ष्मीराणी माझी यांच्या पदकाची अपेक्षा आहे.
[amazon_link asins=’B06XFLY878,B078YW7FSC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2b5c78d9-a2de-11e8-bd7c-61867531276d’]